मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Gondia Crime : बेपत्ता नवविवाहितेचा मृतदेह तलावात आढळला, पतीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप

Gondia Crime : बेपत्ता नवविवाहितेचा मृतदेह तलावात आढळला, पतीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप

गोंदियातील मुररी येथे राहणारी एक महिला  चुटीया गावातील शेतातील तलावात पडून मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर माहिती मिळाली आहे.

गोंदियातील मुररी येथे राहणारी एक महिला चुटीया गावातील शेतातील तलावात पडून मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर माहिती मिळाली आहे.

गोंदियातील मुररी येथे राहणारी एक महिला चुटीया गावातील शेतातील तलावात पडून मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर माहिती मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

गोंदिया, 27 सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्यात अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. गोंदियातील मुररी येथे राहणारी एक महिला गावातील शेतातील तलावात पडून मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर माहिती मिळाली आहे. दरम्यान ही महिला 24 सप्टेंबर पासून बेपत्ता होती तिचा शोध सुरू होता. तिचा चुटिया गाव शिवारातील तलावात तिचे मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दुर्गेश्वरी गुरुदास बिसेन (वय 31) असे विवाहित महिलेचे नाव आहे. दरम्यान दुर्गेश्वरीची हत्या करून तिचा मृतदेह तलावात फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा तिच्या वडिलांसह नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. तर दुर्गेश्वरी बेपत्ता झाल्याची तक्रार दुर्गेश्वरीच्या वडीलांनी गोंदिया शहर पोलिसांत केली होती. दुर्गेश्वरीचा मृतदेह तळ्यात मिळाल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करीत आहेत, तर याचा तपास गोंदिया शहर पोलीस करीत आहे.

हे ही वाचा : दाऊदचा साथीदार रियाझ भाटीला अखेर अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

गोंदियात खळबळ 120 मुला-मुलींचा एकाच ट्रकमधून प्रवास

गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवाशी शाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थींनीची प्रकृती बिघडली आहे. गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने अक्षरश: काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली.

ट्रकमध्ये ज्या 120 मुला-मुलींना अक्षरश: कोंबले होते ते गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आहेत. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जाण्यात आलं होतं. तिथून परतत असताना संबंधित प्रकार घडला. परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले आणि गाडीत गोंधळ उडाला.

हे ही वाचा : जळगाव सुन्न करणारी घटना मुलाने केली सावत्र आईची हत्या, कारण ऐकून धक्का बसेल

अखेर गाडी थांबवण्यात आली. तिथे असलेल्यांना समजत नव्हतं. त्यामुळे तातडीन सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर एका मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं

First published:

Tags: Bhandara Gondiya, Crime news, Murder