मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Gondia Crime : गोंदियात कारमध्ये आढळली तब्बल 1 कोटी 90 लाखांची रक्कम 3 आरोपी अटकेत

Gondia Crime : गोंदियात कारमध्ये आढळली तब्बल 1 कोटी 90 लाखांची रक्कम 3 आरोपी अटकेत

गोंदियामार्गे रायपूरकडे जाणाऱ्या कारमध्ये रोख रक्कम आढळली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

गोंदियामार्गे रायपूरकडे जाणाऱ्या कारमध्ये रोख रक्कम आढळली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

गोंदियामार्गे रायपूरकडे जाणाऱ्या कारमध्ये रोख रक्कम आढळली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

  रवी सपाटे, (गोंदिया) 08 ऑगस्ट : गोंदियामार्गे रायपूरकडे जाणाऱ्या कारमध्ये 1 कोटी 90 लाख 43 हजार रूपयांची रोख रक्कम आढळली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत उघड झाली आहे. (Gondia Crime) या प्रकरणी 3 आरोपींना देवरी पोलिसांनी अटक केली आहे. तर ही रोख कोठून आली, कोणाला देण्यासाठी जात होते याचा शोध देवरी पोलिस घेत आहेत. दरम्यान राज्य सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आजच होत आहे यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

  मंत्रीमंडळ विस्तारावरून तर्कवितर्क

  दरम्यान राज्यात आज मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामुळे राज्यातील काही भागात नाकांबदी करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर गोंदिया जिल्ह्यात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. अचानक मंध्यरात्री कोट्यावधींची रक्कम घेऊन जाताना कार सापडल्याने पोलीस कसून तपास करत आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलीस ठाण्यांर्तगत ही कारवाई करण्यात आली आहे. यापाठीमागे कोण आहे याबाबत अद्यापही पोलीसांना माहिती मिळाली नसली तरी पोलीस तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

  हे ही वाचा : Wheat Rate : मोदी सरकारची डोकेदुखी वाढली, सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या किंमतीत झपाट्याने वाढ

  शिंदे आणि फडणवीस सरकारचा अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे 10 ते 11 आणि एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) असलेल्या 6-7 मंत्र्यांचे शपथविधी होऊ शकतात. भाजपकडून शपथ घेणाऱ्या 9 मंत्र्यांची नावं आता समोर आली आहेत.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर भाजपसोबत घरोबा करून सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, शिवसेना आणि शिंदे गट वाद हा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. पण, महिना उलटल्यानंतर अखेरीस विस्ताराचा निर्णय घेतला.

  हे ही वाचा : राऊतांनंतर पवार कुटुंब अडचणीत? लवासाप्रकरणी शरद पवारांसह सुप्रिया, अजित यांना नोटीस

  त्यानुसार, आज मंगळवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपकडून 9 जणांना फोन करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत यांना आतापर्यंत फोन गेला आहे.

  भाजपच्या या 9 जणांशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना निरोप देण्यात आलेला आहे. उर्वरीत आमदारांनी कोर्टाच्या निकालानंतर शपथ दिली जाणार असल्याची शक्यता आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Bhandara Gondiya, Crime, Crime news

  पुढील बातम्या