मुंबई एअरपोर्टवर सोने तस्करीसाठी चक्क चप्पलचा वापर

मुंबई एअरपोर्टवर सोने तस्करीसाठी चक्क चप्पलचा वापर

सोने तस्करीसाठी चक्क चपलीचा वापर केला गेला.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : मुंबई विमानतळावर घडणाऱ्या सोने तस्करीच्या घटना काही नवीन नाहीत. यापूर्वी अनेकांना सोने तस्करी करताना अटक केले आहे. नवनवीन फंडे वापरून सोन्याची तस्करी केली जाते. मुंबई विमानतळावर अशाच प्रकारची डोकॅलिटी वापरून सोन्याची तस्करी करणाऱ्याला एसीआयएसएफने ताब्यात घेतलं आहे. 381 ग्रॅम वजनाच्या या दोन सोन्याच्या बारची तस्करी करताना एका व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. सोन्याच्या तस्करीसाठी चक्क चप्पलेचा वापर केला गेला होता. पण, एसीआयएसएफने हा सारा प्लॅन उधळून लावला आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ही 11 लाख 12 हजार 139 रूपये इतकी आहे.

कशी झाली कारवाई

मुंबई विमानतळावर चप्पलमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला एसीआयएसएफने ताब्यात घेतलं आहे. राहत अली असं 51 वर्षीय आरोपींचं नाव असून तो भारतीय नागरिक आहे. मुंबई एअर पोर्टवर सकाळी सातच्या सुमारास तपासणीत राहत अलीच्या चप्पलमध्ये धातू असल्याचं समजलं. राहत अली हा बहरीनहून दिल्लीला येत होता. यानंतर सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी राहत अलीची एक्स रे मशीननं तपासणी केली. त्यावेळी चप्पलमध्ये 381 ग्रॅम वजनाचे बार सापडले. यावेळी चौकशी दरम्यान राहत अलीला कोणतीही वैध कागदपत्रं सादर करता आली नाहीत. सध्या जप्त केलेले सोन्याचे बार कस्टमच्या ताब्यात आहेत. दरम्यान, रहत अली विरोधात तस्करीचा गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

VIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर

First published: April 5, 2019, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading