सोन्या,चांदीच्या दरात उसळी, प्रति तोळा दर 32 हजारांवर!

सोन्या,चांदीच्या दरात उसळी, प्रति तोळा दर 32 हजारांवर!

येणाऱ्या अक्षय तृतीयेला तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या बेतात असाल तर तुमचा खिसा जरा जास्त रिकामा होऊ शकतो. कारण सोन्याचा दर प्रति तोळा 32 हजाराच्या घरात जाऊन पोहोचलाय. तर चांदीही ४० हजार रुपये किलोवर गेलीय.

  • Share this:

मुंबई,ता.15 एप्रिल: येणाऱ्या अक्षय तृतीयेला तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या बेतात असाल तर तुमचा खिसा जरा जास्त रिकामा होऊ शकतो. कारण सोन्याचा दर प्रति तोळा 32 हजाराच्या घरात जाऊन पोहोचलाय. तर चांदीही ४० हजार रुपये किलोवर गेलीय.

येत्या बुधवारी अक्षय तृतीया आहे. आणि सोनं खरेदीसाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो. मात्र सोन्याचा भाव असाच चढा राहिला तर सोनं खरेदी करणाऱ्यांचा नक्कीच हिरमोड होणार आहे. काल अमेरिकेनं सीरियावर हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियात तणाव निर्माण झालाय. त्याचा परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावर झाल्याचं दिसतंय.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर 30 हजाराच्या घरात होता. मात्र सीरियावरच्या हल्ल्यानंतर सोन्याच्या भाव प्रतितोळा जवळपास 2 हजारानं वाढला असून तो 32 हजार 300 रूपयांपर्यंत पोहोचलाय. गेल्या काही वर्षातील अक्षय्य तृतीयेचा सोन्याचा हा सर्वाधिक भाव आहे.

सर्वात महागडी अक्षय्य तृतीया

गेल्या काही वर्षात अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव ३० हजार रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम)च्या वर कधी गेला नाही. गेल्या वर्षी ९ मे रोजी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भावा २९, ८६० रुपये होता. २०१८च्या सुरुवातीला सोन्याचा भाव प्रति तोळा (१० ग्रॅम) २८, ५०० रुपये होता. सोन्याचा भाव फक्त भारतात वाढलेला नाही. तर जगभरात सोन्याचा भाव वाढला आहे. न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. तसंच चांदीचाही भाव वाढला.

 

First published: April 15, 2018, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading