मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोन्याचे दर तब्बल 2600 रुपयांनी घटले, हे आहेत जळगाव सराफा बाजारातील नवे दर

सोन्याचे दर तब्बल 2600 रुपयांनी घटले, हे आहेत जळगाव सराफा बाजारातील नवे दर

एकीकड़े शेअर मार्केटमध्ये घसरण होत असताना आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे

एकीकड़े शेअर मार्केटमध्ये घसरण होत असताना आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे

एकीकड़े शेअर मार्केटमध्ये घसरण होत असताना आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे

  • Published by:  Meenal Gangurde
जळगाव, 13 मार्च : सोन्याच्या किंमती वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एकीकड़े शेअर मार्केटमध्ये मोठ्या संख्येने घसरण होत असताना बुधवारी सोन्याचा दर 516 रुपयांनी कमी झाला होता. आज तर सोन्याच्या दरात मोठी घट पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात आणखी घट झाली असून हे दर तब्बल 2600 रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता सोन्याचा दर 41,600 वर पोहोचला आहे. एकीकडे शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणुकदारांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. संबंधित - रुपया घसरल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सोनं उतरलं, गुरूवारचे दर इथे वाचा एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर बाजारातील उलाढालीच्या परिणामामुळे सोनं स्वस्त झालं. सोमवारी सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी 45 हजार 33 रुपयांपर्यंत पोहोचला होता. सोन्याचे दर कमी होण्यामागे अमेरिकन डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेत कमी होणं हे असल्याचं सांगितंल जात आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी वधारला. याशिवाय जागतिक स्तरावर पोषक वातावरणामुळे सोन्याचे भाव कमी झाल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. संबंधित - रेकॉर्ड मोडला! आज सोन्याचे सर्वाधिक दर, गुढीपाडव्याला किमती 50 हजारांवर?
First published:

Tags: Gold prize, Jalgaon sarafa bazar

पुढील बातम्या