Elec-widget

पिकासाठी तारण ठेवलं सोनं परंतु शेतातील कांद्यावर नांगर फिरवण्याची आली वेळ

पिकासाठी तारण ठेवलं सोनं परंतु शेतातील कांद्यावर नांगर फिरवण्याची आली वेळ

सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी असल्यानं शेतकरी हवालदिल, हेक्टरी 50 हजार मदत देण्याची मागणी.

  • Share this:

हरीष दिमोटे (प्रतिनिधी)शिर्डी, 20 नोव्हेंबर:

राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटत नाही तर दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पिकांवरील रोगांमुळे शेतकरी चिंतातूर आहे. सरकारकडून मदतीची आणि पीकविमा मिळण्याची अद्यापही प्रतीक्षा आहे. अतिवृष्टीने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांनी शेतातील कांद्यावर नांगर फिरवला आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक शेतात आज शेतकरी आपल्या कांद्यावर नांगर फिरवताना दिसत आहेत.

कांद्याच्या शेतीतून आपल्याला दोन पैसे मिळतील या आशेने संगमनेर तालुक्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी खरीपात कांदा पेरला होता. सुरुवातीला हवा तेवढा पाऊसही झाला नाही मात्र तरीही मोठ्या कष्टाने हे कांदा पिकाला त्यांनी जगवलं. त्यासाठी ऐनवेळी टँकरनंही पाणी दिलं. आता कांद्यातून आपल्याला किमान नफा मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. 15 गुठ्याला जवळपास 20 ते 25 हजारांचा खर्च झाला आहे. एवढे पैसे कसे जमा करायचे ह्य़ा विवंचनेत शेतकरी आहे. आज जो कांदा शेतात उभा आहे यावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कांदा जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी जीवाचं रान केलं होतं. शासनाने जाहीर केलेली मदत अगदी तुटपुंजी असून आम्ही जगायचं कसं असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करण्याचं काम राज्यातील ग्रामसेवक, तलाठी यांनी केलं. ज्यावेळी पिके पाण्यात होती त्यावेळची परिस्थिती डोळ्याने पाहवतही नव्हती हे सांगताना गावचे ग्रामसेवकही भावूक झाले होते.

Loading...

परिस्थिती कशीही असली तरीही शेतकरी पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र अवकाळी पाऊस, दुष्काळासारख्या संकटांवर मात करता करता शेतकरी पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांनं आपल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 11:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...