मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरीच्या विठोबाला आता सोन्याची वीट!

पंढरीच्या विठोबाला आता सोन्याची वीट!

देवाच्या खजिनातील 25 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि 830 किलो चांदीचे दागिने वितळविले जाणार आहेत. हे सगळे दागिने वितळवून त्याच्या विटा केल्या जाणार आहेत.

देवाच्या खजिनातील 25 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि 830 किलो चांदीचे दागिने वितळविले जाणार आहेत. हे सगळे दागिने वितळवून त्याच्या विटा केल्या जाणार आहेत.

देवाच्या खजिनातील 25 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि 830 किलो चांदीचे दागिने वितळविले जाणार आहेत. हे सगळे दागिने वितळवून त्याच्या विटा केल्या जाणार आहेत.

सुनील उंबरे, पंढरपूर

पंढरपूर, 21 मार्च : गरिबांचा देव म्हणून ओळख असलेल्या श्री विठ्ठल रखुमाईच्या खजिन्यात जमा होणाऱ्या सोने आणि चांदीच्या दागिण्याला वितळवून आता त्याच्या विटा तयार करण्यात येणार आहे. असा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीने घेतलाय.

मंदिर समितीच्या खजिन्यात सोने चांदी आणि हिरे, मोती अन माणकांचे शेकडो दागिने आहेत यामध्ये शिवकालीन दागिन्यांपासून ते पेशव्यांनी दिलेल्या अनमोल असे अलंकार आहेत या ऐतिहासिक दागिन्यांचे मंदिर समिती व्यवस्थापनाने फार काळजीने जतन केले आहे.

पण 1985 नंतर भाविकांनी देवाला दान स्वरूपात दिलेले शेकडो दागिने देवाच्या खजिन्यात अनेक वर्षांपासून पडून आहेत हे दागिने देवाला घातलेही जात नाहीत त्यामूळे या दागिन्यांचे करायचे काय असा प्रश्न मंदिर समिती पुढे होता यासाठी तत्कालीन मंदिर समितीने 15 मार्च 2015 रोजी सोने व चांदी वितळविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली होती. समितीच्या या प्रस्तावावर शासनाने एक समिती गठीत करून दागिने वितळविण्याची परवानगी दिली होती नंतर हा विषय मागे पडला होता

आता नवनियुक्त मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी या विषयाला पुन्हा चालना दिल्याने देवाच्या खजिनातील 25 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि 830 किलो चांदीचे दागिने वितळविले जाणार आहेत. हे सगळे दागिने वितळवून त्याच्या विटा केल्या जाणार आहेत

विटा तयार केल्यानंतर शिर्डीच्या धर्तीवर श्री विठ्ठलाची छबी असलेली नाणी करून ती भक्तांना उपलब्ध करून द्यायची का असा प्रस्ताव मंदिर समिती समोर आहे. म्हणजे गरिबांचा देव आता सध्या विटे ऐवजी सोन्याच्या विटेवर उभा राहणार आहे.

First published:

Tags: Gold bricks, Mandir, Pandharpur, Silver, Vitthak, Vitthal, दागिने, पंढरपूर, मंदिर, विठ्ठल, सोन्याच्या वीटा