गोकुळने केली गायीच्या दूध दरात 2 रूपयांनी कपात; शेतकरी नाराज

गोकुळने केली गायीच्या दूध दरात 2 रूपयांनी कपात; शेतकरी नाराज

त्यामुळे आधी गायीच्या दुधासाठी शेतकऱ्यांना 27 रुपये भाव मिळायचा, तो आता 25 रुपय एवढाच मिळणार आहे. तोटा होत असल्याचं कारण गोकुळ दूधसंघानं दिलंय

  • Share this:

01 नोव्हेंबर: पश्चिम महाराष्ट्रातलं दुग्ध व्यवसायातलं बडं प्रस्थ गोकुळनं शेतकऱ्यांना धक्का दिलाय. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात गोकुळनं 2 रुपयांनी कपात केलीय.

त्यामुळे आधी गायीच्या दुधासाठी शेतकऱ्यांना 27 रुपये भाव मिळायचा, तो आता 25 रुपय एवढाच मिळणार आहे. तोटा होत असल्याचं कारण गोकुळ दूधसंघानं दिलंय. म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात मात्र कोणताही कपात करण्यात आलेली नाही.

तसंच इतर दुध संघांनी भावही कमी केले आहे. यामुळे शेतकरी संघांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यामुळे त्यांच्या खूप मोठा तोटा झाला आहे. शेतकरीनेते रघुनाथदादा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी संघ यासंदर्भात सरकारकडे तक्रार करणार आहे. सा संदर्भात कुठलंही आंदोलन केलं जाणार नाही.

त्यामुळे आता सरकार याप्रकरणी लक्ष घालतं का आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 01:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading