पणजी 09 सप्टेंबर : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांनी मृत्यूआधी ज्या क्लबमध्ये पार्टी केली होती, त्या गोव्यातील कर्ली क्लबवर कारवाई सुरू झाली आहे. क्लबबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने गोव्यातील 'रेस्टॉरंट कर्ली' पाडण्यास स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावल्याने कर्ली क्लब पाडण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला धक्कादायक वळण; तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप
कर्ली रेस्टॉरंटचे मालक एडविन न्युन्स यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली. यामध्ये गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथॉरिटीच्या कर्ली रेस्टॉरंट पाडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. एनजीटीने या प्रकरणावर सुनावणी घेतल्यानंतर कर्ली रेस्टॉरंटची याचिका फेटाळून लावली. म्हणजे एनजीटीने कर्ली रेस्टॉरंट पाडण्याचा मार्ग मोकळा केला.
GCZMA ने 21 जुलै 2016 रोजी कर्ली रेस्टॉरंट पाडण्याचे आदेश दिले होते. कर्ली हे नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीरपणे बांधलं गेलं आहे, असं सांगण्यात आलं होतं. त्याविरोधात कर्ली रेस्टॉरंटचे मालक एडविन न्युन्स यांनी एनजीटी म्हणजेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे अपील केलेलं. हे अपील NGT ने 6 सप्टेंबर 2022 रोजी फेटाळले.
गोवा पोलिसांनी 27 ऑगस्ट रोजीच कर्ली क्लबच्या मालकाला अटक केली होती. यासोबत पोलिसांनी क्लबच्या बाथरुमधून ड्रग्ज देखील हस्तगत केले होते. पोलिसांनी सोनाली फोगट प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट आणि कुटुंबीयांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुधीर आणि सुखबिंदर यांना अटक केली. याच सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांच्यासोबत फोगाट 22 ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या.
गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी याच क्लबमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं आहे. यात सुधीर एका बाटलीतून सोनाली फोगाट यांना काहीतरी पाजत असल्याचं दिसून आलं आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Goa