मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Goa Election Result Updates: मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना धक्का; सांकेलीम मतदारसंघात काँग्रेसच्या धर्मेश सगलानींची आघाडी

Goa Election Result Updates: मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना धक्का; सांकेलीम मतदारसंघात काँग्रेसच्या धर्मेश सगलानींची आघाडी

प्रमोद सावंत (Pramod Sawant trailing) सध्या पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे. सांकेलीम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी ४३६ मतांनी आघाडीवर आहेत

प्रमोद सावंत (Pramod Sawant trailing) सध्या पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे. सांकेलीम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी ४३६ मतांनी आघाडीवर आहेत

प्रमोद सावंत (Pramod Sawant trailing) सध्या पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे. सांकेलीम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी ४३६ मतांनी आघाडीवर आहेत

  मुंबई 10 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकांच्या (Goa Assembly Election 2022) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. अशात आता एक मोठी बातमी गोव्यातून समोर आली आहे (Goa Election Result Updates). गोव्यातील सांकेलीम मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. कारण या मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांच्यात चुरशीची लढत आहे. अशात आता या मतदारसंघात प्रमोद सावंत (Pramod Sawant trailing) सध्या पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे. सांकेलीम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी ४३६ मतांनी आघाडीवर आहेत

  40 जागा असलेल्या गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे; मात्र आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमजीपी आदी पक्षांनी यावेळी जोर लावल्यामुळे सर्वांचं लक्ष निकालाकडे आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गोव्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या; मात्र तरीही सरकार स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं होतं.

  2017 साली काँग्रेसने 40 पैकी 17 जागा जिंकल्या आणि तीन जागा जिंकलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीसह अनौपचारिक आघाडीही केली होती; मात्र केवळ 13 जागा जिंकलेल्या भाजपने राजकीय खटपटी करून सरकार स्थापन करण्यात यश प्राप्त केलं होतं. त्यामुळे यावेळी कोणाला बहुमत मिळतं का आणि ते नाही मिळालं तर कोणाची कोणाशी आघाडी होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Assembly Election, Goa