पणजी, 29 मार्च: ज्या आईनं यशोदेप्रमाणे लहानपणापासून पालन पोषण केलं, राहण्यासाठी घर दिलं. पोटच्या लेकाप्रमाणे आपलंस करत माया लावली, त्याच माऊलीचा दत्तक मुलाने निर्घृण खून केला आहे. आरोपी दत्तक मुलानं आपल्या अल्पवयीन प्रेयसीच्या मदतीनं आईचा काटा काढला (adopted son killed mother) आहे. राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत खऱ्या मारेकऱ्याला गजाआड (Accused arrested) केलं आहे. आरोपी दत्तक मुलानं हत्येची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित घटना गोव्यातील संवर्दम भागात घडली आहे. तर हत्या झालेल्या महिलेचं नाव मनीषा नाईक असं आहे. तर प्रथमेश नाईक असं अटक केलेल्या दत्तक पुत्राचं नाव आहे. आरोपीनं लोखंडी रॉडने डोक्यात जोरदार वार करून त्यांची हत्या (Brutal murder by attack with iron rod) केली होती. राहत्या घरात मनीषा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण त्यांची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली? याचा गूढ बनलं होतं. अखेर पोलिसांनी कसून तपास करत हत्येचं गूढ उलगडलं आहे.
हेही वाचा- लव्ह स्टोरीचा भयावह शेवट, घरातून पळालेल्या प्रेमीयुगुलांचा नातेवाईकांनी केला मरेपर्यंत पाठलाग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश याचं मागील काही दिवसांपासून परिसरातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. त्याला आपल्या प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं. पण आई मनीषा यांनी या लग्नाला विरोध केला होता. लग्नाला विरोध केल्याच्या रागातून आरोपीनं प्रेयसीच्या मदतीने आईच्या हत्येचा कट रचला. लहानपणापासून पालनपोषण केलेले सर्व उपकार आरोपी क्षणात विसरला. त्यानं प्रेयसीच्या मदतीने लोखंडी रॉडने वार करून आईची हत्या केल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा- Mumbai: प्रेयसीनं नकार देताच तिच्या 7 महिन्याच्या भावावर उगवला सूड, भयंकर स्थितीत आढळला मृतदेह
या प्रकरणी पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी आरोपी प्रथमेशला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्यानं हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच या हत्येप्रकरणात आरोपीच्या प्रेयसीचा सहभाग आहे का? याचाही तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Goa, Murder Mystery