भाजपचा काँग्रेसला दे धक्का, पंचायत निवडणुकीत घेतली मोठी आघाडी

भाजपचा काँग्रेसला दे धक्का, पंचायत निवडणुकीत घेतली मोठी आघाडी

मतमोजणीचा पहिला कल हाती आला असून भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने आतापर्यंत 13 जागा जिंकल्या.

  • Share this:

अनिल पाटील, प्रतिनिधी

गोवा, 14 डिसेंबर : गोव्यात पार पडलेल्या जिल्हा पंचायती निवडणुकीची (Goa Zilla Panchayat Election 2020) मतमोजणी आता सुरू आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला असून भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने आतापर्यंत 13 जागा जिंकल्या असून अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे.

गोव्यात दोन जिल्हा पंचायतींच्या 58 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार.  दोन्ही जिल्हा पंचायतींवर  भाजपचं  वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीसाठी 57 टक्के मतदान झाले होते. उत्तर गोव्यामध्ये भाजपने आतापर्यंत  25 पैकी  नऊ जागा जिंकली असून  दक्षिण गोव्यात  25 पैकी चार जागा जिंकल्या आहेत  अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले असून त्यांना भाजपचा पाठिंबा आहे.

कोरोना परिस्थितीमुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. अखेर कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे निवडणुका घेण्यात आल्या आहे. परंतु, तरीही  मतदारांचा निरुत्साह आणि कोरोनाच्या भीतीने लोकं बाहेर पडली नाही. त्यामुळे मतदान हे कमी झाले होते.

त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा भाजपला फायदा झाल्याचे बोलले जाते. गोव्यातल्या नगरपालिका आणि महानगरपालिका वगळून ग्रामीण भागामध्ये 2 जिल्हा पंचायतींसाठी 12 डिसेंबरला मतदान झाले होते. एप्रिल 2020 मध्ये होणारे हे मतदान कोरोनामुळे पुढ ढकलण्यात आलं होतं.

नव्याने तारखा जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं जाहीर प्रचाराची मुभा न दिल्याने सर्वांमध्ये निरुत्साह होता. ही निवडणूक पक्षीय पातळीवरती झाली असून भाजपने 41 तर काँग्रेसने 37 इतके उमेदवार उभे केले होते. याशिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 17 आम आदमी पक्षाचे 20 उमेदवार ही या रिंगणात आहेत.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप आघाडीवर असल्याचा स्पष्ट झाले आहे. भाजपच्या सामूहिक प्रयत्नांना यश आहे, असं भाजपच्या कामगार मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी सांगितले.

Published by: sachin Salve
First published: December 14, 2020, 2:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या