गोव्याचं सरकार 'व्हेंटिलेटर'वर, पर्रीकरांपासून ते आमदारांपर्यंत सगळेच आजारी !

गोव्याचं सरकार 'व्हेंटिलेटर'वर, पर्रीकरांपासून ते आमदारांपर्यंत सगळेच आजारी !

गोव्याच्या मनोहर पर्रीकर सरकारमध्ये गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत सगळेच आजारी आहे.

  • Share this:

संदीप सोनवलकर

गोवा, 11 जुलै : गोव्याच्या मनोहर पर्रीकर सरकारमध्ये गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत सगळेच आजारी आहे. सगळेच महत्त्वाचे मंत्री आजारी पडल्यामुळे सध्या गोव्याचं सरकार हे प्रशासकांच्या हाती आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वत: गेल्या काही दिवसांपासून स्वादुपिंडाच्या आजारामुळे अस्वस्थ आहेत. आतापर्यंत मनोहर पर्रीकर 2 वेळा अमेरिकेत उपचारासाठी गेले होते. आणि आता 15 ऑगस्टला तिसऱ्यांदा ते 10 दिवसांसाठी अमेरिकेला जाणार आहेत.

जेव्हा पर्रीकर अमेरिकेला होते तेव्हा गोव्याचे संपूर्ण अधिकार हे मुख्य सचिव आणि एका कमिटीकडे सोपण्यात आले होते. आताही प्रकृती

ठीक नसल्यामुळे बहुतेक वेळा ते घरातूनच काम करतात.

लाखो रुपये कमवण्याचा सोपा उपाय, नोकरी सोडून करा हे काम !

बरं फक्त पर्रीकरच आजारी नाहीत तर त्यांच्या सरकारमध्ये ज्येष्ठ ऊर्जा मंत्री आणि समाज कल्याण मंत्री पांडुरंग मडकईकर यांना ब्रेन स्ट्रोक झाला आहे. उपचारासाठी ते मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात भरती आहेत. त्यांचं ऑपरेशन झालं आहे पण ते अद्याप पूर्णपणे बरे झाले नाहीत.

दुसरीकडे पब्लिक वर्क डिपार्टमेंटचे मंत्री सुधीन धवलीकर यांनाही ब्रेन स्ट्रोक झाला आहे. त्यांना ब्रीच कॅडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनाही एक महिन्यासाठी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

इतकंच नाही तर मापसाचे आमदार फांसिस डिसूजा आणि वास्कोचे भाजप आमदार कार्लोस अलमेडादेखील आजारी आहेत. त्यांनाही विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की गोव्याचे पावसाळी अधिवेशन होणार की नाही.

व्यवसाय आणि उद्योगधंद्यामध्ये आंध्र प्रदेश नंबर वन आणि महाराष्ट्र थेट !

कमी मतांनी पर्रीकर सरकारने गोव्यात बहुमत मिळवलं आहे. भाजपकडे त्यांचे 15 आमदार आहेत. त्यात 3 विधायक विकास पार्टीचे आणि 3 हे अपक्ष आमदार आहेत. आणि काँग्रेसचे 18 आमदार आहेत. त्यामुळे काहीही घोळ झाला तर त्याचा मोठा फटका पर्रीकरांना बसू शकतो. त्यामुळे सध्यातरी सगळे मंत्र्यांचे स्वास्थ योग्य रहावे यासाठी प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा...

महात्मा गांधींच्या विद्यापीठातच होतेय हिंसा, पाच मुलींना केले निलंबित

जपानमधल्या पुरामध्ये मृतांची संख्या 179वर, भूस्खलनाने हाहाकार

या अटीवर सचिनने पाणीपुरी विकणाऱ्या बॅट्समनला दिली त्याची बॅट

First published: July 11, 2018, 12:41 PM IST

ताज्या बातम्या