जून अखेरीस गोव्याला परतणार मनोहर पर्रिकर

जून अखेरीस गोव्याला परतणार मनोहर पर्रिकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर जून अखेरीस परततील, अशी माहिती परिवहनमंत्री सुदीन ढवळीकर यांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 30 मे : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर जून अखेरीस परततील, अशी माहिती परिवहनमंत्री सुदीन ढवळीकर यांनी दिली आहे. पर्रिकरांवर सध्या स्वादुपिंडाच्या आजारावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. ७ मार्चपासून पर्रिकर अमेरिकेत आहेत. त्यांच्या नेतृत्वात गोवा सरकार आपली ५ वर्षं पूर्ण करेल, असंही ढवळीकर म्हणाले आहेत.

पण दरम्यान, गेल्या १०० दिवसांपासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्याने घटनात्मक पेच निर्माण झाल्याचा दावा करून काँग्रेस विधीमंडळ पक्षानं राष्ट्रपतींना साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच काँग्रेस आमदारांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी म्हटले आहे.

कवळेकर यांनी आपल्या विधानसभेतील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्यातील समस्यांवर गंभीर चर्चा केली. तसेच या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपाय योजनेचेही प्रस्ताव तयार ठेवले आहेत.

पहिली समस्या म्हणजे गोव्याला मुख्यमंत्री नसणे आणि ती सोडविण्यासाठी काँग्रेसचे आमदार राष्ट्रपतीना भेटणार आहेत. अद्याप तारीख ठरली नसली तरी लवकरच भेटणार आहेत असे त्यांनी सांगितले. पण त्याआधीच मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

 

First published: May 30, 2018, 9:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading