सोलापूर, 19 ऑक्टोबर : 'बिहारला गेलाच आहात तर पुढे दिल्ली जावे, निदान पंतप्रधान मोदी हे तरी बाहेर पडतील', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी भाजप नेते शेतकऱ्यांना राज्य सरकार मदतनिधी जाहीर करत नसल्याचा आरोप केला आहे, असा सवाल विचारला असता, उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
'कुणीही राजकीय चिखलफेक करण्याची गरज नाही. सध्या महाराष्ट्रावर मोठे संकट कोसळले आहे. पण, विरोधी पक्ष नेते हे बिहारला प्रचाराला जात आहे. देवेंद्र फडणवीस हे बिहारला प्रचाराला गेले, त्यांनी आता पुढे जाऊन दिल्लीला जावे, जर दिल्लीला गेले तर पंतप्रधान मोदी सुद्धा बाहेर पडतील, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
'तुम्ही राज्याचे जबाबदार राजकारणी आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्याची वेळ आहे. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा जर स्वत:चे राज्य हे अडचणीत असेल तर राज्यासोबत एकत्र येऊन केंद्राकडून मदतीसाठी मागणी केली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.
'केंद्र सरकार हे काही परदेशातील सरकार नाही. पक्षपात न करता सर्व राज्यांना मदत करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारवर आहे. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी माझ्याशी बोलले आहे. त्यामुळे काही मदत लागल्यास हक्काने मागणार आहे. ती मदत ते दिल्याशिवाय राहणार नाही' असंही ठाकरे म्हणाले.
'सध्या शेतीचे पंचनामे सुरू आहेत, आढावा घेऊन मदत केली जाणार आहे. तुर्तास मृतांच्या नातेवाईकांना आज प्रातिनिधिक मदत दिली आहे. आतापर्यंत मागील सरकारकडून फक्त घोषणाबाजी करण्यात आली आहे. पण, आम्ही कोणतीही घोषणाबाजी करणार आहे. थेट मदत पुरवणार आहोत, असंही ठाकरे म्हणाले.
हे संकट अजून टळलेले नाही. येत्या काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे घाईगडबडीने काही केले जाणार आहे. सर्वांची काळजी घेण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.