मनसेचा झेंडा बदलताच, पुण्यात कार्यकर्त्यांनी झळकावले इशारा देणारे बॅनर्स!

मनसेचा झेंडा बदलताच, पुण्यात कार्यकर्त्यांनी झळकावले इशारा देणारे बॅनर्स!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनासोबत नवी राजकीय भूमिका काय असणार हे स्पष्ट झालंय.

  • Share this:

पुणे, 23 जानेवारी :  मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाअधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक बॅनर लावले आहे. या बॅनरमध्ये हा हिंदूस्थान आहे, पाकिस्तान किंवा बांगलादेश नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनासोबत नवी राजकीय भूमिका काय असणार हे स्पष्ट झालंय. पुण्यात मनसेकडून सगळ्या शहरभर बॅनरबाजी करण्यात आली आहे. ज्यात 'चले जाव...हा हिंदुस्थान आहे. बांग्लादेश किंवा पाकिस्तान नाही', असा इशारा दिला आहे. एनआरसीचं राज ठाकरे यांनी समर्थन केल्यानंतर त्यांनी बदलेला झेंडा याचा स्पष्ट अर्थ हा त्यांच्या बदलेल्या भूमिकेची मांडणी करत आहे.

देशात हिंदुत्व आणि राज्यात मराठी हा मनसेचा अजेंडा असणार आहे. त्याचेच होर्डिंग आणि बॅनर मनसेकडून शहरभर लावण्यात आले आहे. हे बॅनर मनसेचे नेते अजय शिंदे, सुधीर धावडे आणि राम बोरकर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अमित ठाकरेंची राजकारणात एंट्री

दरम्यान, मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचं राज्य अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांची  मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. 14 वर्षांनंतर मनसेचा महाअधिवेशन मेळावा होत आहे. या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये पहिल्यांदाच अमित ठाकरेंवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

'27 वर्षांत पहिल्यांदाच मी जाहीर व्यासपीठावर बोलत आहे. तुम्ही सर्वांनी आज आणि याआधीही मला जे प्रेम दिलं आहे, ते भविष्यातही द्याल, यासाठी मी आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो,' असं म्हणत अमित ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. तसंच पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी शिक्षण ठरावही मांडला आहे. अमित ठाकरे यांनी आज महाअधिवेशनामध्ये पहिल्यांदा ठराव मांडला आहे.  गुणवत्तेच्या शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना होण्याची अवश्यकता आहे.

लहान मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याबाबत तातडीनं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.  क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचं असल्याचं सांगत अमित ठाकरे यांनी ठराव मांडला आहे.

राज ठाकरेंकडून 'राजमुद्रे'चा गैरवापर, मनसेविरुद्ध पुण्यात तक्रार दाखल

मनसेच्या झेंड्यावर छञपतींची राजमुद्रा छापल्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडनं पुणे पोलिसात रितसर तक्रार दाखल केली आहे. पक्षांच्या झेंड्यावरील राजमुद्रा तत्काळ हटवली नाहीतर थेट रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं उत्तर दिलं जाईल, अशा इशाराच या संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.  मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यास सर्वात आधी आक्षेपही संभाजी ब्रिगेडनेच घेतला होता. त्यामुळे आगामी काळात राज्यात मनसे विरूद्ध संभाजी ब्रिगेड असा संघर्ष बघायला मिळणार हे नक्की.

First published: January 23, 2020, 4:44 PM IST

ताज्या बातम्या