Home /News /maharashtra /

'मुख्यमंत्री साहेब, तुमच्या दारात येऊन सामूहिक आत्मदहन करू'

'मुख्यमंत्री साहेब, तुमच्या दारात येऊन सामूहिक आत्मदहन करू'

वादग्रस्त ठरलेल्या मैत्रेय फंडमध्ये राज्यातील अनेक लोकांनी पैसा गुंतवला होता. बीड जिल्ह्यातील 25 ते 30 हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी अडकल्या आहेत.

    बीड, 09 डिसेंबर : कराड जनता सहकारी बँकेचा (Karad Janata Sahakari Bank) बँकिंग परवाना (License Cancelled) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रद्द केल्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आता मैत्रेय फंड पैसे गोळा केलेल्या ठेवादारांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वादग्रस्त ठरलेल्या मैत्रेय फंडमध्ये राज्यातील अनेक लोकांनी पैसा गुंतवला होता. पण, संचालकांनी लाखो ठेवीदारांना गंडा घातला. बीड जिल्ह्यातील 25 ते 30 हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. जास्ती व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना पीडित महिलांनी आपली व्यथा मांडली. 'एकट्या बीड शहरात 40 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे असे पीडित गुंतवणूकदार महिलांनी सांगितलं. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती ,यांचे फोटो अभिप्राय, पुरस्कार दाखवून ठेवी गोळा केल्याचे गुंतवणूक करणाऱ्या महिलांनी सांगितलं. 'लोकं दारात येऊन आत्महत्या करण्याच्या धमक्या देत आहेत आणि त्यांचे पैसे द्यायचे आहे,  असं म्हणताना अक्षरशः ठेवीदारांच्या डोळ्यात पाणी आले. आतापर्यंत शहरात पैसे बुडाल्यामुळे काही जणांनी आत्महत्या देखील केली असल्याचंही महिलांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  आमच्या ठेवीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारात येऊन एकत्रित आत्मदहन करू, असा इशारा देखील या महिलांनी दिला आहे. कराड जनता सहकारी बँकेच्या ठेवीदारांना  धक्का दरम्यान, कराड जनता सहकारी बँक आता अवसायनत (Liquidation) मध्ये गेल्याचं  सहकार आयुक्तांनी  जाहीर केलं आहे. परवाना रद्द झाल्यानंतर त्यांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. अवसायनिक म्हणून उपनिबंधक मनोहर माळी यांची या बँकेवर नियुक्ती करण्यात आली आहे. 2017 मध्ये कराड शहर पोलिसात जनता बँकेच्या संचालक मंडळासह काही अधिकाऱ्यांवर 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर 6 ऑगस्ट 2019 रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधांनंतर कराड जनता सहकारी बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. बँकेबाबत अनेक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्यानंतर आज रिझर्व्ह बँकेने ही बँकिंग परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या