मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आम्हाला न्याय द्या, नाही तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लस द्या', परळीत अजब मागणी

'आम्हाला न्याय द्या, नाही तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लस द्या', परळीत अजब मागणी

'आमच्या कुटुंबाला न्याय द्या, नाही तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लस द्या', अशी अजब मागणी करण्यात आली आहे.

'आमच्या कुटुंबाला न्याय द्या, नाही तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लस द्या', अशी अजब मागणी करण्यात आली आहे.

'आमच्या कुटुंबाला न्याय द्या, नाही तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लस द्या', अशी अजब मागणी करण्यात आली आहे.

बीड,13 मार्च:'आमच्या कुटुंबाला न्याय द्या, नाही तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लस द्या', अशी अजब मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे होमटाऊन अर्थात परळीतून या मागणीने जोर धरला आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रासमोर 500 प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा दुसऱ्या दिवस आहे. आमच्या कुटुंबाला न्याय द्या, नाही तर कोरोना रोगाच्या संसर्गाची लस द्या, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. उपोषणास कुटुंबासह महिला व लहान मुले देखील बसले आहेत. अनेक वेळा उपोषण करून देखील न्याय मिळाला नाही. प्रशासनाने अद्याप कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाला न्याय द्या नाही, तर कोरोना रोगाच्या संसर्गाची लस द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. हेही वाचा..विवाहितेनं पिझ्झा डिलिव्हरी बॉयशी जुळवलं सूत, पिता-पुत्रानं असा काढला काटा परळी औष्णिक विद्युत केंद्रासमोर 500 प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींनी कुटुंबासह उपोषण सुरू केले आहे. तीन वर्षे पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे. एक हजार पदांची भरती करावी, या मागण्यांसाठी परळी वीज निर्मिती केंद्रातील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतीने उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे. 1000 पदांची भरती करुन सर्व प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याबाबत अनेक वेळा निवेदने देऊनही त्यावर कार्यवाही झाली नाही. मागण्या मान्य करून त्वरीत अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी हे उपोषण सुरु आहे. हेही वाचा...पुण्यात कोरोनाच्या दहशतीचा परिणाम, कुटुंबाला सोसायटीमध्ये 'नो एण्ट्री'
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या