मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शेजाऱ्यांना चहा पाजून पंतप्रधान मोदींचे आभार माना' दानवेंचा अजब सल्ला

'शेजाऱ्यांना चहा पाजून पंतप्रधान मोदींचे आभार माना' दानवेंचा अजब सल्ला

'मोदींनी गरिबाच्या पोटी जन्म घेतला  म्हणून त्यांना गरिबांची जाण आहे. तुमचे बुडालेले पैसे मिळाल्याबद्दल घरी जाताच...'

'मोदींनी गरिबाच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना गरिबांची जाण आहे. तुमचे बुडालेले पैसे मिळाल्याबद्दल घरी जाताच...'

'मोदींनी गरिबाच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना गरिबांची जाण आहे. तुमचे बुडालेले पैसे मिळाल्याबद्दल घरी जाताच...'

जालना, 13 डिसेंबर : 'आपल्या बोलीभाषा आणि गावरान भाषणामुळे सदैव चर्चेत राहणारे केंद्रीय रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे ( raosaheb Danve ) यांनी आज कहरच केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (pm narendra modi) धन्यवाद देण्यासाठी दानवेंनी बँक ठेवीदारांना चक्क शेजाऱ्यांना चहा (tea) पाजण्याचा अजब सल्ला दिला आहे.

दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील अर्जून जाधव व सत्यभामा जाधव या ठेवीदारांना विम्याच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. तर जालना येथे  ठेवीदारांना प्रतिनिधिक स्वरूपात  केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले, यावेळी दानवेंनी आपल्या शैलीत भाषण ठोकलं.

वाशिममध्ये पडला पिवळसर रंगाचा पाऊस, 'ॲसिड रेन' च्या शक्यतेनं गावात खळबळ

'मंठा सहकारी  बँकेतील 28 हजार 536 खातेदारांना विम्याची रक्कम मंजूर झाली असून 27 हजार 534 खातेदाराच्या खात्यात सुमारे 37 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झाले. मोदींनी गरिबाच्यापोटी जन्म घेतला  म्हणून त्यांना गरिबांची जाण आहे. तुमचे बुडालेले पैसे मिळाल्याबद्दल घरी जाताच शेजाऱ्यांना आणि मित्र मंडळींना चहा पाजून मोदींचे आभार माना असा अजब सल्लाच राज्यमंत्री दानवे यांनी ठेवीदारांना दिला.

निवडणूक हरला म्हणून उमेदवाराने मतदारांनाच दिली शिक्षा; Video समोर आल्यानंतर अटक

तसंच, सर्वसामान्य व्यक्ती आपल्या भविष्यासाठी काबाडकष्ट करून पुंजी बँकांमध्ये ठेवतो, परंतु बँक अडचणीत आल्यास ठेवीदारांना त्यांची पुंजी परत मिळणार नाही या विचाराने तो हतबल होतो. अशा ठेवीदारांनी सहकारी बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवींवर  डीआयजीसीजी (डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) यांच्यामार्फत विमा काढण्यात येतो. यापूर्वी केवळ 50 हजार व एक लक्ष रुपयांचा विमा काढण्यात येत होता. परंतु यामध्ये सप्टेंबर 2021 मध्ये  सुधारणा करत  विमा रकमेची रक्कम पाच लक्ष रुपयापर्यंत करण्यात आली असल्याचे सांगून संपूर्ण देशभरात 18 ठिकाणी आजच्या दिवशी ठेवीदारांना विमा रकमेचे वितरण करण्यात येत असल्याचेही  दानवे यांनी यावेळी सांगितले.

First published:

Tags: भाजप, रावसाहेब दानवे