Home /News /maharashtra /

शिवसेनेला ऑफर देत रामदास आठवलेंनी भाजपला दिला सल्ला, म्हणाले....

शिवसेनेला ऑफर देत रामदास आठवलेंनी भाजपला दिला सल्ला, म्हणाले....

  'निवडणूक प्रचारात देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र असा भाजपचा प्रचार होता. पण तेव्हा सेनेने आक्षेप घेतला नाही'

'निवडणूक प्रचारात देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र असा भाजपचा प्रचार होता. पण तेव्हा सेनेने आक्षेप घेतला नाही'

'निवडणूक प्रचारात देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र असा भाजपचा प्रचार होता. पण तेव्हा सेनेने आक्षेप घेतला नाही'

नाशिक, 10 जानेवारी : महाविकास आघाडी सरकारला (mva government) दोन वर्ष पूर्ण झाले आहे. एकीकडे युतीचा नवा पूल बांधण्याचे विधान सेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केले आहे. तर दुसरीकडे, पुन्हा एकदा रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेनेला (shivsena) ऑफर दिली आहे. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेबाहेर काढण्यासाठी भाजपने मन मोठं करुन शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर द्यावी, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मित्रपक्ष भाजपला दिला. रामदास आठवले नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना आठवले यांनी भाजपचीच समजूत काढण्याचा प्रयत्न केला.  'या वेळी दोन्ही पक्षांनी पुन्हा युती करावी' असा सल्ला त्यांनी दिला. 'निवडणूक प्रचारात देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र असा भाजपचा प्रचार होता. पण तेव्हा सेनेने आक्षेप घेतला नाही. पण निकालानंतर आकडे आले तेव्हा आपल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही हे लक्षात आल्यावर सेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरला. तेव्हा सेनेचा अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फार्म्युला भाजपने फेटाळला, असंही आठवले म्हणाले. (IND vs SA : चुकीला माफी नाही! धोनीचा 'गुरूमंत्र' देऊन कोहलीचा पंतला इशारा) तसंच, 'भाजपला विश्वास होता, काँग्रेस पाठिंबा देणार नाही आणि त्यांचा तो अंदाज चुकला व सेनेने दोन्ही काँग्रेससोबत जात सत्ता स्थापन केली. पण सेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपद दिल्यास ते युती करतील. पण भाजप हा सल्ला ऐकले की नाही याबाबत मात्र आठवलेंनी बोलणं टाळलं. (हातात गीता अन् टीशर्टवर जावेद अख्तरांचं नाव; उर्फी जावेदचा नवा जुगाड) 'उद्धव ठाकरे आणि आमचे घराचे संबध आहे. भीम शक्ती व शिव शक्ती एकत्र आली होती. उद्धव ठाकरे यांनी लवकर बरे होऊन कोरोना विरोधात दंड थोपटावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ramdas athawale

पुढील बातम्या