• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ... अन्यथा धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करणार, संतप्त पीडितेचा इशारा

... अन्यथा धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करणार, संतप्त पीडितेचा इशारा

पीडितेवर लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच वाळू माफिया असणाऱ्या आरोपी तरुणाने सतत अत्याचार केला होता.

  • Share this:
बीड, 28 जुलै: स्वतःवर सतत झालेल्या शारीरिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या, अत्याचारग्रस्त नर्सलाचं (Victim Nurse) पोलिसांकडून हिन वागणूक देत अर्वाच्च भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्वाच्च भाषा वापरणार्‍या बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामधील (Shivaji nagar Police Station Beed) दोन पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला निलंबित करा आणि मला न्याय द्या ही मागणी घेऊन पीडित नर्सने उपोषण सुरू केले आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पीडितेने हे आमरण उपोषण सुरू केलं आहे. जर मला न्याय नाही मिळाला तर मी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanjanay Munde) यांच्या घरासमोर आत्मदहन करेल असा टोकाचा इशारा संतप्त झालेल्या पीडित नर्सने दिला आहे. पीडितेवर लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच वाळू माफिया असणाऱ्या आरोपी तरुणाने सतत अत्याचार केला होता. त्यानंतर त्या तरुणाच्या मामाने त्याचं इतर मुलीसोबत लग्न लावलं आणि ते प्रकरण तिथेच मिटवलं. मात्र त्यानंतरही तो तरुण दारू पिल्यानंतर पीडितेच्या रूमवर येऊन अत्याचार करत असे. याच सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आवाज उठवला. मात्र तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी केला असा आरोप पीडितेने केला आहे. मद्यधुंद व्यक्तीचा तोल बिघडला अन्..., अंगावर काटा आणणारा मृत्यूचा LIVE VIDEO "सहा वर्ष तुला गोड लागलं" मग आता कशाला आली तक्रार देण्यास असं म्हणत तिला हीन वागणूक देत अर्वाच्च भाषा देखील वापरली. यामुळे पोलीस निरीक्षक ठोंबरे, पीएसआय मीना तुपे आणि कर्मचारी मेखले यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी हे आमरण उपोषण असचं सुरू ठेवेल. असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी दिला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय ? कुठं चिमुकलीवर अत्याचार होतोय तर कुठं गुंगीचं औषध देऊन बलात्कार होत आहे. तर कुठं शरीरसुखाची मागणी घेऊन महिलेला मारहाण आणि एवढं होऊनही न्यायाची मागणी घेऊन पोलीस ठाण्यात हीन वागणूक मिळतेय. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. जे सरकार छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलं, त्या सरकारच्या काळातच अशा दुर्दैवी घटना घडत असतील, तर हे खूप वाईट आहे. याची नैतिक जबाबदारी म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी केले आहे.
Published by:Sunil Desale
First published: