मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'50 लाख रुपये द्या अन्यथा RDX नं मंदिर उडवून टाकू', अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकीचे पत्र

'50 लाख रुपये द्या अन्यथा RDX नं मंदिर उडवून टाकू', अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकीचे पत्र

 बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी-वैद्यनाथ देवस्थानला दोन दिवसांपूर्वी धमकीचं पत्र मिळालं होतं.

बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी-वैद्यनाथ देवस्थानला दोन दिवसांपूर्वी धमकीचं पत्र मिळालं होतं.

बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी-वैद्यनाथ देवस्थानला दोन दिवसांपूर्वी धमकीचं पत्र मिळालं होतं.

  • Published by:  Pooja Vichare

बीड, 28 नोव्हेंबर: बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी-वैद्यनाथ देवस्थानला दोन दिवसांपूर्वी धमकीचं पत्र मिळालं होतं. यात 50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने उडवून टाकू अशी धमकी देण्यात आली होती. मात्र आता एकदा परळीच्या (Parli) वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईच्या (Ambajogai) योगेश्वरी (Yogeshwari temple) मंदिराला RDX ने उडवण्याची धमकीचं पत्र ( threaten letter) मिळालं आहे. या पत्रामुळे एकच खळबळ माजली आहे.

आता बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थांच्या नावाने देखील अशाच पद्धतीचे धमकीचे पत्र मिळालं आहे. बीड जिल्ह्यातील देवस्थानांना धमकीचे पत्र देणारा कोण त्याच्या पोलिसांनी लवकरात लवकर मुसक्या आवळण्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

काय लिहिलं आहे पत्रात

आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवू.

हेही वाचा-  चिंता वाढवणारी बातमी, भिवंडीत वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना Corona ची लागण

अशी धमकी असलेलं पत्र अंबाजोगाईच्या देवल कमेटीमध्ये शनिवारी रात्री पोहोचलं. अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला हे पत्र मिळताच देवल कमिटी चे सचिव अँड.शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली. तसंच सुरक्षितता राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. परळीच्या वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरास ही असे धमकीचे पत्र प्राप्त झाल्यानं पोलिसांना आता या प्रकरणाचा कसून तपास करावा लागणार आहे.

First published:

Tags: Beed