Home /News /maharashtra /

माझे आई-बाबा कुठे? चुकून पाकिस्तानात गेलेली गीता नाशिकमध्ये पोहोचली, पण...

माझे आई-बाबा कुठे? चुकून पाकिस्तानात गेलेली गीता नाशिकमध्ये पोहोचली, पण...

'आपलं घर हे रेल्वेस्थानकाच्या बाजूला, मंदिर आणि नदीच्या आसपास असल्याचं गीताचं म्हणणं आहे. शेतात ऊस आणि भुईमुगाचं पीक असल्याचं आठवणीही गीताच्या आहे.

नाशिक, 17 डिसेंबर : आपल्या जन्मस्थानावरून, जिवंतपणीच चालती बोलती आख्यायिका बनलेली गीता (Geeta) आता नाशकात (Nashik) पोचली आहे. पाकिस्तानातून आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी आलेली मूकबधीर गीता, नाशिकात शोध घेतेय, आपल्या पालकांचा. नाशिकच्या, एकलहरा भागात राहणाऱ्या रमेश सोळसे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला. लहानपणी तिच्या आईनं, गीताला रेल्वेत सोडून दिल्याचं रमेश यांचं म्हणणं आहे. गीता ही नाशिकरोड मार्गाने दिल्ली आणि नंतर लाहोरला पोहचली असल्याचा अंदाज रमेश यांनी व्यक्त केला. यावेळी रमेश यांनी गीताचा जन्मदाखला दाखवत गीताला गावाची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गीताचं समाधान झाल्याचं काही दिसत नाही. मुंबईत कोरोनामुळे मृत्यूचा आकडा एकअंकी; हा हर्ड इम्युनिटीचा परिणाम? 'आपलं घर हे रेल्वेस्थानकाच्या बाजूला, मंदिर आणि नदीच्या आसपास असल्याचं गीताचं म्हणणं आहे. शेतात ऊस आणि भुईमुगाचं पीक असल्याचं आठवणीही गीताच्या आहे. दरम्यान, रमेश सोळसे यांनी याआधी देखील गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला होता. तेव्हा त्यांची डीएनए टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, माझ्या पत्नीचा डीएनए तपासावा असा त्यांचा आग्रह कायम आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी, पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या दौऱ्यावर निघाली. दोन दशकांपूर्वी कुटुंबापासून ताटातूट झाल्याने लहानपणीच गीता चुकीने थेट पाकिस्तानात पोहोचली होती. पालकांनो लक्ष द्या! अपुरी झोप तुमच्या किशोरवयीन मुलांना देतेय डिप्रेशन रमेश सोळसे करत असलेला दावा खरा आहे का? हे तपासण्यासाठी गीता आणी तिच्यासोबत इंदूरहून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल धाव घेतली. पोलीस निरीक्षक सूरज बीजली यांनी सत्यता तपासण्यासाठी रमेश यांच्या पत्नीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केला. रमेश सोळसे यांची पत्नी असलेल्या शोभा यांनी दुसरा विवाह केला असून, त्या गीतासमोर आल्यानंतर पुन्हा एकदा डीएनए तपासणी केली जाणार असली तरी आपल्या जन्मदात्यांच्या शोधात असलेली,गीताची ही पायपीट संपणार तरी कधी? गीताला खरोखर तिचे आईबाप मिळणार का ? हा प्रश्न आज तरी अनुत्तरीत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या