महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना आई-वडिल जबाबदार -सोमाभाई मोदी

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना आई-वडिल जबाबदार -सोमाभाई मोदी

नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावे ही देशातील जनतेची इच्छा आहे असंही सोमाभाई मोदी म्हणाले.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 16 आॅक्टोबर : देशभरात लहान मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या घटना

पालकांसाठी चिंतेची बाब ठरलेली असताना, अश्या घटनांसाठी पालकच जबाबदार असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी व्यक्त केलं.

पिंपरी जवळ असलेल्या साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी आज सोमाभाई मोदी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी देशात मुलींवर वाढत्या अत्याचाराबद्दल प्रश्न विचारला असता सोमाभाई मोदी यांनी अशा घटनांना मुलींचे आई-वडिल जबाबदार असतात असं म्हटलंय.

आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे जेणे करून मोठं झाल्यावर त्यांनी कोणती गडबड करू नये. मुलगी रात्री घरी उशिरा येते तेव्हा ती कुठे गेली असं विचारलं जातं पण मुलगा जेव्हा रात्रभर घराबाहेर राहतो तेव्हा त्याला कुणी काही विचारत नाही असंही मोदी म्हणाले.

दरम्यान, देशात सर्वांना अच्छे दिन कधी येणार ? असा सवाल विचारला असता, मोदी म्हणाले की, अजून किती अच्छे दिन यायला हवे ?, जर मोफत दिलं तर अच्छे दिन आले असं म्हणतील. पण मेहनत करण्यासाठी जागा मिळालीये तर मेहनत केली पाहिजे, कमावले पाहिजे. शिक्षणासाठी देशभरात मोठी विद्यापीठं उभारलीये, चांगला अभ्यास केला पाहिजे, शाळेत मुलांच्या प्रवेशाच्या समस्य होत्या त्या आता दूर झाल्या आहेत असा दावाही मोदी यांनी केलाय.

नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावे ही देशातील जनतेची इच्छा आहे असंही सोमाभाई मोदी म्हणाले.

====================================

First published: October 16, 2018, 6:23 PM IST

ताज्या बातम्या