पुण्यात चाललंय काय? पत्ता विचारणाऱ्या तरुणीनं थँक्स म्हटल्यावर त्यानं जबरदस्तीनं गालावर केलं KISS

पुण्यात चाललंय काय? पत्ता विचारणाऱ्या तरुणीनं थँक्स म्हटल्यावर त्यानं जबरदस्तीनं गालावर केलं KISS

पत्ता विचारणाऱ्या तरुणीने थँक्स म्हटल्यावर एका भामट्याने तिला जबरदस्तीने मिठी मारून तिच्या गालावर किस करून विनयभंग केला. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

  • Share this:

पुणे, 16 मे- बिअर बारचा पत्ता व्यवस्थित न सांगितल्याने तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असताना पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्ता विचारणाऱ्या तरुणीने थँक्स म्हटल्यावर एका भामट्यानं तिला जबरदस्तीने मिठी मारून तिच्या गालावर किस करून विनयभंग केला. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल (ता.15) ही घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेऊन लष्कर पोलिसांनी आरोपीला 24 तासांच्या आत अटक केली आहे. राम बदरीलाल दबोडिया (वय-42) असं आरोपीचे नाव आहे.

काय आहे हे प्रकरण?

रस्ता चुकलेल्या पीडित तरुणीने मित्राचा पत्ता विचारणासाठी रस्त्यावर थांबलेला आरोपी राम दबोडिया याला त्याचा फोन मागितला. त्याने फोन दिली. फोन दिल्याबद्दल संबंधित मुलीने त्याला थँक्स म्हणण्यासाठी हात पुढे केला. त्यानंतर आरोपीने तरुणीचा हात धरून तिली जबरदस्तीने मिठी मारून तिच्या गालावर किस केले. या प्रकरणी पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेची गंभीर दखल घेऊन लष्कर पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपीला शोधून काढून त्याला अटक केली.

बिअर बारचा पत्ता व्यवस्थित न सांगितल्याने तरुणावर गोळीबार

बिअर बारचा पत्ता व्यवस्थित न सांगितल्याने तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात पुण्यात घडली होती. अहमदनगरहून आलेल्या तिघांनी अल्पवयीन तरुणावर गोळीबार केला होता. गोळीबार केल्याचा गंभीर प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या गोळीबारात सनी चौधरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणांना बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये जायचे होते. मात्र, बारचा पत्ता व्यवस्थित सांगितला नाही, या कारणावरून अहमदनगरहून आलेल्या तिघांनी एका अल्पवयीन मुलावर छऱ्याच्या एअरगनने फायर करून जखमी केले. त्यानंतर त्याला खडकी येथील मरीआई गेटजवळ टाकून त्यांनी पोबारा केला होता. शनिवारी (11 मे) पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी युवकाने आधी घाबरून खरा प्रकार सांगितला नाही. परंतु पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यावर खरा प्रकार उघडकिस आला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी अंबादास अशोक होंडे (वय-28, रा. दापोडी, मूळ अहमदनगर) याला अटक केली आहे.

VIDEO: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला मारहाण करत हिसकावली सोनसाखळी

First published: May 16, 2019, 3:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading