भिवंडी, 11 जानेवारी : भिवंडी (Bhiwandi) शहर आणि ग्रामीण भागात अवैध धंद्याला ऊत आला असून पोलीस प्रशासनाला अवैध धंदे रोखण्यास अपयश आले असतानाच येवई नाका इथं खुलेआम हुक्का पार्लर (hookah parlour ) सुरू असून त्यामध्ये तरुण-तरुणी कशा प्रकारे नाचून धिंगाणा घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भिवंडीत गेल्या वर्षांत मोठ्या संख्येनं हुक्का पार्लर आणि इतर अवैध धंद्यांनी बस्तान मांडले आहे. बिनबोभाटपणे या धंद्यांचा कारभार सुरू आहे. मात्र, पोलिसांचे अशा अवैध धंद्याकडे का लक्ष देत नाही आणि कारवाई का करीत नाही असा प्रश्न नागरिक करीत आहे.
भिवंडीतील एका हुक्का पार्लरमधला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण-तरुणी बेफामपणे डान्स करत असल्याचे दिसत आहे. तसंच या व्हिडीओमध्ये हुक्क्याचं सेवनही केले जात असल्याचे समोर आले आहे.
महत्वाची बाब म्हणजे, शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असताना पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांचे दुर्लक्ष असल्याने समोर आले आहे. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नसल्याने ठाणे पोलीस आयुक्तांनीच लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi