कोल्हापूर, 5 नोव्हेंबर: लग्नास नकार दिल्यानं प्रियकरासोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात प्रेयसीनं पंचगंगा नदीत उडी मारली. प्रेयसीनं नदीत उडी घेतल्यानंतर लगेच प्रियकरानं देखील नदीत मारली.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर दोघांनाही बाहेर काढलं सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, दोघांवरही करवीर पोलिस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी पुलावर गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
हेही वाचा...मुलांच्या खेळण्यावरून दोन गटात राडा, हाणामारीत केला अॅसिड हल्ला, 6 होरपळले
मिळालेली माहिती अशी की, तरुण (प्रियकर) हा पन्हाळा तालुक्यातील पुनाळ गावचा तरुणी (प्रेयसी) ही वाळवेकरवाडी येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे तरुणी ही घटस्फोटीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध आहेत.
प्रेमीयुगुलांची बराच वेळ चालली चर्चा...
प्रेमीयुगुल गुरुवारी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर भेटले. दोघांमध्ये लग्न करण्यावरून बराच वेळ चर्चाही झाली. पण, प्रियकरानं लग्नास नकार दिल्यानं प्रेयसी संतापली. रागाच्या भरात तिनं पुलावरून थेट पंचगंगेत उडी घेतली. हा प्रकार पाहून प्रियकराचं भंबेरी उडाली. त्यानंही तिच्या पाठोपाठ नदीत उडी घेतली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. स्थानिक तरुण मदतीला घावून आले. त्यांनी तातडीनं नदीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाला सुखरुप पाण्यातून बाहेर काढलं. या धावपळीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.
हेही वाचा...उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरून केलं मोठं विधान, म्हणाले वेळ पडल्यास...
संबंधित प्रेमीयुगुलाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध करवीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्या पालकांना बोलावून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.