Home /News /maharashtra /

विवाहितेच्या प्रियकरानं दुसऱ्या बॉयफ्रेंडचा काढला काटा, रचला अपघाताचा बनाव पण...

विवाहितेच्या प्रियकरानं दुसऱ्या बॉयफ्रेंडचा काढला काटा, रचला अपघाताचा बनाव पण...

प्रेमात अडसर ठरत असल्यानं बायकोच्या जुन्या प्रियकारानं संबंधित व्यक्तीची निर्घृण हत्या केली आहे.

प्रेमात अडसर ठरत असल्यानं बायकोच्या जुन्या प्रियकारानं संबंधित व्यक्तीची निर्घृण हत्या केली आहे.

Murder In Karmala: विवाहित प्रेयसीचे दुसरीकडे अनैतिक संबंध (Immoral relation) असल्याचं कळल्यानंतर चिडलेल्या प्रियकरानं संबंधित नवीन प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे.

    करमाळा, 26 मे: प्रेयसीनं दुसरीकडे अनैतिक संबंध (Immoral relation) जुळवल्यानं चिडलेल्या प्रियकरानं संबंधित नवीन प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी प्रियकारानं आपल्या प्रेयसीच्या नवीन बॉयफ्रेंडचा अपघात घडवून हत्या केली आहे. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत हत्येचं गूढ उलगडलं असून आरोपी प्रियकराला गजाआड (Accused lover arrest) केलं आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत. संबंधित मृत झालेल्या व्यक्तीचं नाव विजय काकडे असून ते करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील रहिवासी आहेत. तर संशयित आरोपीचं नाव अक्षय उतरेश्वर ढावरे असं आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी ढावरे याच्या प्रेयसीनं त्याला धोका देऊन मृत विजय काकडे याच्यासोबत प्रेमसंबंध सुरू केले होते. हाच राग मनात धरून ढावरे यानं रविवारी पहाटे मॉर्निग वॉकला गेलेल्या विजय काकडे याची अंगावर पिक अप गाडी घालून चिरडून हत्या केली. पण हा अपघात नसून हत्या असल्याचं पोलिसांनी आपल्या तपासात उघड केलं आहे. हे वाचा-तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने एकाची हत्या, रागाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल संशयित आरोपी अक्षय ढावरे हा वडशिवणे गावातील सोमनाथ मगर यांच्या पिकअप गाडी ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याचं एका विवाहित महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. पण कालांतराने संबंधित महिलेनं अक्षयकडे दुर्लक्ष करून विजय काकडे याच्याशी अनैतिक संबंध जुळवले. हा राग मनात धरून अक्षयने विजयचा काटा काढण्याचं ठरवलं. यानंतर त्यानं पूर्वनियोजित कट रचून मॉर्निंग वॉकला गेलेल्या विजयचा अपघात घडवून आणला. या अपघाताच्या वेळी पिकअप गाडीची हेडलाइट फुटून काचा घटनास्थळी पडल्या. हे वाचा-एकाच कुटुंबातील 4 महिलांवर बलात्कार; ढोंगी बाबाचे कारनामे उघड झाल्यावर खळबळ यानंतर पोलीस तपास सुरू असताना पोलिसांना एक पिकअप गाडीची हेडलाइट फुटल्याचं निदर्शनास आलं. याप्रकरणी पोलिसांनी पिकअप गाडीचे मालक सोमनाथ मगर यांची चौकशी केली. पण मगर यांनी अपघातासाठी वापरलेली पिकअप गाडी संशयित आरोपी अक्षयकडे होती, अशी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीनं संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder, Solapur

    पुढील बातम्या