धक्कादायक! आधी पाहिलं क्राईम पेट्रोल, मग प्रेयसीनं केला प्रियकरावर अॅसिड हल्ला

प्रियकराने फसवणूक केल्याच्या रागात प्रियसीने त्याच्यावर अॅसिडने हल्ला केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 09:05 PM IST

धक्कादायक! आधी पाहिलं क्राईम पेट्रोल, मग प्रेयसीनं केला प्रियकरावर अॅसिड हल्ला

अहमदनगर, 08 मे: सर्वसाधारण एकतर्फी प्रेम अथवा नकारातून मुलींवर अॅसिड हल्ल्याच्या घटना होतात. पण नगरमध्ये अॅसिड हल्ल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने फसवणूक केल्याच्या रागात प्रियसीने त्याच्यावर अॅसिडने हल्ला केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित मुलीला अटक केली आहे.

शहरातील प्रेमदान चौकातील तोरणा हॉटेलमध्ये अमिर रशिद शेख (वय-25) याच्यावर अंजूम शेख हिने अॅसिड फेकले. अमिर आणि अंजूम यांच्यात गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. अमिर इतर मुलींशी मैत्रीकरून फसवणूक करतो याचा राग मनात धरून अंजूमने क्राइम पेट्रोल ही मालिका पाहून अमिरच्या तोंडावर अॅसिड फेकले.

या प्रकरणी पोलिसांनी प्रथम चौकशीकरुन सोडून दिले होते. पण त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज व चौकशीनंतर पुन्हा तिला नारायणडोहमधून ताब्यात घेण्यात आले. दुसऱ्यांदा केलेल्या चौकशीत तिने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

हेही वाचा : मातृत्वाला कलंक! अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या मुलाला आईनेच संपवलं

दरम्यान, पोलिसांनी आता आरोपी मुलीचा कसून तपास करण्यास सुरुवात केली आहे. तिने अॅसिट कुठून आणलं? ते आणण्यासाठी तिला कोणी मदत केली? या सगळ्याचा आता पोलीस शोध घेत आहे.

Loading...

क्राईम पेट्रोल पाहून केला हल्ला...

अमिर शेख आणि अंजूम या दोघांचे प्रेम संबंध होते. पण अमिर इतर मुलींशी बोलायचा आणि त्यांना फसवायचा ही बाब अंजूमच्या लक्षात आली. यात अंजूमने क्राईम पेट्रोल मालिकेमध्ये अॅसिड हल्ला पाहिला होता. त्यामुळे अमिरचा बदला घेण्यासाठी तिने अॅसिड हल्ला करण्याचं ठरवलं.

अमिरवर हल्ला करण्यासाठी ती डिसेंबरपासून तयारीत होती. पण आता संधी मिळताच तिने त्याच्यावर हल्ला केला. या हल्लानंतर सदर आरोपी अंजूमला पोलिसांनी ताब्यात घेतलं. क्राईम पेट्रोल मालिका पाहिल्यानंतर मी अमिरवर हल्ला केल्याची कबुली अंजूमने पोलिसांसमोर दिली आहे.


VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...