मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रेमाचा दुर्दैवी शेवट, 12 वीमध्ये शिकणाऱ्या तरुण-तरुणीने घेतला एकाच झाडाला गळफास

प्रेमाचा दुर्दैवी शेवट, 12 वीमध्ये शिकणाऱ्या तरुण-तरुणीने घेतला एकाच झाडाला गळफास

 18 वर्षीय प्रेमी युगलांनी (girlfriend and boyfriend suicide) एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात घडली

18 वर्षीय प्रेमी युगलांनी (girlfriend and boyfriend suicide) एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात घडली

18 वर्षीय प्रेमी युगलांनी (girlfriend and boyfriend suicide) एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात घडली

भंडारा, 05 डिसेंबर : महाविद्यालयात (collage student) शिकणाऱ्या 18 वर्षीय प्रेमी युगलांनी (girlfriend and boyfriend suicide) एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकोली तालुक्यातील सुंदरी गावात ही घटना घडली आहे. कोमल वाघ (वय १८, राहणार परसोडी) व कमलेश राऊत (वय १८, राहणार सुंदरी) असे मृतकांचे नाव आहे.

शेअर बाजारात मंदीत संधी! पडझडीदरम्यान ब्रोकरेज फर्मची 'हे' शेअर खरेदीची शिफारस

आज सकाळी सुंदरी गावात एक शेतकरी आपल्या शेताकडे जात असताना त्याला एकाच झाडावर कमलेश आणि अमोलने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. लागलीच याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच एकच गर्दी घटनास्थळी झाली.

घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

तुमचा लोकेशन डेटा करोडो-अब्ज रुपयांना कसा विकला जातो?

मृतक हे नम्रता ज्युनिअर कॉलेज साकोलीमध्ये 12 वीचे विद्यार्थी आहे. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. कमलेश आणि कोमलने आत्महत्याचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, प्रेम प्रकरणाच्या वादातून दोघांनी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

शेतकरी दाम्पत्याने केली आत्महत्या

दरम्यान, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात एका शेतकरी दाम्पत्याने अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने आपल्या आयुष्याचा शेवट (Farmer Couple Commits Suicide) केला. शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पत्नीनं घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Jump into well and suicide) केल्यानंतर, अवघ्या अर्ध्या तासात पतीनेही आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. एकाच दिवशी शेतकरी दाम्पत्याने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने त्यांची त्यांची दोन्ही मुलं पोरकी झाली आहे. आत्महत्येच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदानंद गुलाबराव गव्हाणे (39) आणि ज्योती सदानंद गव्हाणे (32) असं आत्महत्या करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे. ते सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील रहिवासी होते. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेला दुष्काळ आणि ओला दुष्काळामुळे शेतीत झालेलं नुकसान आणि नापिकीला कंटाळून दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

First published: