लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा खून

लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा खून

विशालनगर येथील अपूर्वा अनंत यादव या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या राहता घरात आढळून आला

  • Share this:

नितीनकुमार बनसोडे, लातूर, 16 आॅक्टोबर: लातूरच्या विशाल नगर भागात एका २० वर्षीय तरुणीचा दिवसाढवळ्या खून झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. अपूर्वा अनंत यादव असं या तरुणीचं नाव आहे.

विशालनगर येथील अपूर्वा अनंत यादव या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या राहता घरात आढळून आला. पोटात चाकूने भोसकून तिचा खून करण्यात आला होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घरात तिची आई-वडिल नव्हते.

नवरात्रामुळे तिची आई ही देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेली होती. तर तीचे वडील हे मेडिकलचे दुकान चालवतात ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.

काही दिवसांपूर्वीच अपूर्वा ही आपल्या घरी आली होती. ती सध्या कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. अपूर्वाची आई घरी आल्यावर तिला झालेली घटना कळाली. त्यानंतर तात्काळ तिला लातूरच्या शासकीय दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

उत्तरीय तपासणी सध्या सुरू आहे. एमआयडीसी पोलिसांचे दोन पथके सध्या या गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत करण्यात आली असून खुनाचे नेमके काय कारण आहे ? या हत्येमागे कोणाचा हात आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

यादव परिवारातील एकुलती एक असलेल्या या निरागस मुलीचा अश्या प्रकारे खून झाल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. पोलीस सध्या गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

======================================================================

First published: October 16, 2018, 7:38 PM IST

ताज्या बातम्या