कल्याणमध्ये दिवसाढवळ्या महिलेची हत्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

कल्याणमध्ये दिवसाढवळ्या महिलेची हत्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

कल्याणमध्ये दिवसाढवळ्या महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

अजित मांढरे (प्रतिनिधी), 

ठाणे, 5 जुलै- कल्याणमध्ये दिवसाढवळ्या महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एका तासाच्या आत पोलिसांनी आरोपी बाबू ढकणी याला अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये एका महिलेला चाकू भोसकून दोन बाईकस्वार फरार झाले होते. या प्रकरणी बाबू ढकणी या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. या महिलेचा खून का केला याचा तपास पोलीस करत आहेत.

कल्याण पश्चिम येथील एपीएमसी मार्केटमध्ये महिला आपल्या मित्रांना भेटण्यासाठी आली होती. दोन तरुण बाईकवर आले ज्या ठिकाणी महिला उभी होती, त्या ठिकाणी या दोन तरुणांनी आपली बाईक उभी केली. दोघांपैकी एक तरुण बाईकवरून खाली उतरला व त्याने सनमवर चाकूने सपासप वार केले आणि दोघे पळून गेले. स्थानिक लोकांनी या महिलेला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

कल्यान अॅडिशनल सीपी दत्तात्रय कराळे आणि डीसीपी विवेक पानसरे यांनी सहापथक आरोपींच्या शोधासाठी धाडले. पोलिसांना महिलेच्या अॅक्टिव्ह गाडीमधून मोबाईल सापडला त्या मोबाईलवरून आरोपी कोण होऊ शकतो, याचा सुगावा पोलिसांना लागला तासभरात पोलिसांनी बाबू ढकणी या हल्लेखोराला अटक केली त्याचा साथीदाराचा शोध सुरू आहे. ही तरुणी आणि आरोपी बाबू एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत होती. या महिलेला एपीएमसी मार्केटमध्ये कुणी बोलावून घेतले होते, बाबू तिकडे कसा पोहोचला आणि त्यांच्या साथीदाराच्या मदतीने तिची हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.

VIDEO: भररस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्रानं सपासप वार

First published: July 5, 2019, 11:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading