वडिलांची हत्या करून बॅगेत कोंबणाऱ्या मुलगी-जावयाला अटक

वडिलांची हत्या करून बॅगेत कोंबणाऱ्या मुलगी-जावयाला अटक

  • Share this:

अकोला,16 आॅक्टोबर : प्रॉपर्टीच्या वादातून जन्मदात्या वडिलांचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणातील आरोपी मुलगी किरण शिव आणि तिचा पती विजय तिवारी यांना प्रतापनगर पोलिसांनी अकोल्याहून अटक केली आहे.

या दोघांनाही पोलीस नागपुरात घेऊन आले आहे.  त्यांना कोर्टात हजर केले जाईल. काल पहाटे हे दोघं मुलीच्या वडिलांचा खून करून मृतदेह रिक्षातून नेत होते. पण सुटकेसचा आकार आणि वजन पाहून रिक्षाचालकाला संशय आला, आणि त्यानं पोलिसांकडे धाव घेतली. 24 तासांत पोलिसांनी दोघांना अटक केली.

काही दिवसांपूर्वी नागपूर शहरात एका बॅगमध्ये मृतदेह आढळल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचे एक-एक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहे.

काय घडलं ?

रविवारी मध्यरात्री दुर्गा स्टँडवरून तरुण-तरुणींनी रिक्षा पकडली. त्यांनी रिक्षाचालक  विनोद सोनडवले याला रेल्वे स्टेशनकडे जाण्याचं सांगितलं. पण तरुण-तरुणीचं बॅगसह सोनडवलेंना यांचं वर्तन संशयास्पद वाटलं. एवढंच नाहीतर बॅगमधून दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी त्यांना विचारणा केली.  थोडे पुढे जाताच दोघांनी बॅग रिक्षातच ठेवून पोबारा केला.

रिक्षाचालकाने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवली आहे. जी माहितीसमोर आली त्याने पोलिसांनाही धक्का बसला. ज्या पुरुषाचा मृतदेह सापडला होता त्याच्याच मुलीने आपल्या पतीचे मदतीने संपवलं होतं.

सायकल दुरुस्तीचे काम करणारे मानसिंग शिव यांचे नागपूरच्या प्रतापनगरात दोन खोल्याचे घर आहे. बुलडाण्यात हाॅटेल चालवणारा विजय तिवारी आणि मानसिंग यांची मुलगी किरण यांचे तीन वर्षांपुर्वी लग्न झाले त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. गेल्या सहा महिन्यांपासून किरण ही नागपुरात वडिलांकडे राहत होती. सासऱ्यांकडे वारंवार येणाऱ्या विजयने हे घऱ आपल्याला देण्याची मागणी अनेकदा केली होती. पण आधीच गरिब असणारे आणि सायकल दुरुस्तीचे काम करणारे मानसिंग यांना घर देणं शक्य नसल्यानं त्यांनी विजयला नकार दिला. पण किरण आणि विजय या दोघांनी मिळून मानसिंग यांचा खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो सुटकेसमध्ये भरून तो आॅटोरिक्षामध्ये भरून रेल्वे स्टेशनकडे नेण्याचं ठरवलं.

त्यानंतर हे दोघंही फरार होते.पण आज त्यांना अटक करण्यात पोलिसांना अटक झाली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 01:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading