प्लास्टिक बंदीमुळे गिरीश महाजनांनी कागदावरच खाल्ली झुणका-भाकर !

प्लास्टिक बंदीमुळे गिरीश महाजनांनी कागदावरच खाल्ली झुणका-भाकर !

राज्यातल्या प्लॅस्टिकबंदीचा धसका चक्क मंत्री गिरीश महाजन यांनीही घेतलेला दिसतो.

  • Share this:

जळगाव, 26 जून : राज्यातल्या प्लॅस्टिकबंदीचा धसका चक्क मंत्री गिरीश महाजन यांनीही घेतलेला दिसतो. जळगावमध्ये ते शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आले होते. जेवणाच्या वेळेला काही कार्यकर्त्यांनी प्लास्टिकचं ताट आणि चमचे आणले. पण महाजनांनी ते परत नेण्यास सांगत कागदी डिशमध्ये जेवण केलं. पाणी पिण्यासाठीही त्यांनी स्टीलचा ग्लास बोलवला.

सध्या प्लास्टिक बंदीच्या कारवाईला संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. अनेकांनी प्लास्टिक बंदीच्या कारवाईचा धसका घेतला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील हा धसका घेतल्याचं पहायला मिळालं.

हेही वाचा...

चिकन खाताय,सावधान!, कोंबड्यांना दिली जातात इंजेक्शन!

शिक्षक मतदार संघाच्या मतदान केंद्र बुथवर ते आले असता त्यांनी जेवणा साठी चक्क कागदाचा वापर केल्याचे पाहायला मिळालं. याठिकाणी काही कार्यकर्त्यांनी जेवणासाठी प्लास्टिक ताट आणि पाण्या साठी बाटल्या मागविल्या होत्या.

मात्र प्लास्टिक बंदीला पाठिंबा देत त्यांचा वापर टाळून त्यांनी स्टीलचा ग्लास पिण्याच्या पाण्यासाठी आणि कागदाचा वापर झुणका भाकर ठेवण्यासाठी केला. गिरीश महाजन चक्क झुणका भाकर कागदावर ठेऊन खात असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा...

VIDEO : मौसम मस्ताना, छत्री उघडून बसमध्ये बसताना ?

VIDEO : बापरे!, एकाच घरात सापडली 100 कोब्राची पिल्लं !

सनी लिओनला लातुरात आणणाऱ्या अविनाश चव्हाणची गोळ्या झाडून हत्या

हत्तीचा बसवर हल्ला

First published: June 26, 2018, 7:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading