गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंचं 'मिले सुर मेरा तुम्‍हारा'!

'नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात. एवढेच नाही तर आम्ही दोघेही नेहमी एकमेकांची पाठराखण करत असतो.'

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 07:59 PM IST

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंचं  'मिले सुर मेरा तुम्‍हारा'!

राजेश भागवत, जळगाव 14 ऑगस्ट : कोल्हापूर, सांगलीच्या महापूरात मदत कार्यासाठी गेलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी प्रकरणामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. त्यावर महाजनांनी स्पष्टीकरणही दिलं आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांचा बचाव केला. नंतर महाजनांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या एकनाथ खडसेही गिरीश महाजन यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. महाजन आणि खडसे यांच्यात तसं राजकीय सख्य नाही. महाजनांना पुढे करायचं असल्यामुळेच आपला पत्ता कापला असं एकनाथ खडसेंना वाटतं. तसं त्यांनी अप्रत्यक्षरित्या अनेकदा बोलूनही दाखवलं. त्यामुळे खडसे यांच्या या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. त्याला प्रतिसाद देत गिरीश महाजन यांनीही खडसेंचे आभार मानलेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात या दोन राजकीय विरोधकाचं 'मिले सुर मेरा तुम्‍हारा' चालल्याची जोरदार चर्चा आहे.

टीकेनंतरही मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' यात्रा पुन्हा सुरू होणार! या आहेत तारखा

महाजन म्हणाले, नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात. एवढेच नाही तर आम्ही दोघेही नेहमी एकमेकांची पाठराखण करत असतो. परंतु माध्यमांना आमच्याविषयी भलतच काहीतरी वाटत असतं. नाथाभाऊंनी माझी पाठराखण केली हे चांगलेच झाले अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

खसेंनी केली होती पाठराखण

एकनाथ खडसे हे कायम महाजनांना टोले लगावत असतात. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी महाजनांचा केलेला बचाव विशेष समजला जातो. आपल्यावर झालेल्या आरोपांचा हवाला देत त्यांनी गिरीश महाजनांचा बचाव केला. खडसे म्हणाले, कोल्हापूर सांगली सातारच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाजन यांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी मदत पोहोचविली. एवढाच काय तर स्वतःही पाण्यात उतरून पूरग्रस्तांना वाचविण्यात पुढाकार घेतला. मात्र महाजन यांनी केलेल्या मदती पेक्षा माध्यमांनी त्यांच्या सेल्फीला प्राधान्य देत त्यांच्यावर टीका केली.

Loading...

युरोपच्या सर्वोच्च शिखराजवळ 'मावळ्यां'नी फडकवला 73 फुटाचा तिरंगा

माध्यमांच्या या टीकेचा आपल्यालाही फटका बसला आहे. आपण केलेल्या चांगल्या कामापेक्षा दाऊदच्या बायकोशी आपले संबंध असल्याचं जास्त पसरविलं गेलं. माध्यमांनी कोणत्याही वृत्ताची खात्री करूनच ते प्रसिद्ध करावं आणि आपली विश्वासार्हता वाढवायला हवी असं खडसे यांनी म्हटलंय. टीआरपीच्या नादात माध्यमांनी आपण केलेली विधाने तोडमोड करून दाखविल्याचा आरोप देखील खडसे यांनी केलाय. पाचोरा  तालुक्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 07:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...