Home /News /maharashtra /

'उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी संभाजीराजेंना जाणीवपूर्वक फसवलं', गिरीश महाजनांची गंभीर टीका

'उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी संभाजीराजेंना जाणीवपूर्वक फसवलं', गिरीश महाजनांची गंभीर टीका

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना जाणीवपूर्वक फसवलं", अशी गंभीर टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.

    नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 29 मे : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) तापल्याचं चित्र आहे. छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढवणार होते. त्यांनी सर्वपक्षांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर ते शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणुकीला तयार झाले होते. पण नंतर शिवसेना आणि त्यांच्यात एकमत न झाल्याने त्यांनी निवडणून न लढवण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) शब्द फिरवला, अशी टीका केली होती. पण त्यांची टीका योग्य नसल्याचं त्यांचे वडील शाहू महाराज (Shahu Maharaj) प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलले. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) टीका केली. भाजपने संभाजीराजेंचा गैरवापर केला, असा घणाघात संजय राऊतांनी केला. या सर्व घडामोडींनंतर आता भाजपकडून माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आधीच सगळं ठरलं होतं. त्यांनी राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात संभाजीराजेंना जाणीवपूर्वक फसवलं आहे", अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे आयोजन जळगावातील मातोश्री आनंद आश्रमात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'मोदींचं काम विरोधकांना बघवत नाही' "पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत आहेत, हे विरोधकांना बघवत नाही. नरेंद्र मोदींना आणि भाजपला सर्व निवडणुकांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी मोदी चांगलं काम करत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी काळं धन बाहेर आणत आहेत", असा दावा त्यांनी केला. (महाविकास आघाडीत निधीवरुन धुसफूस, श्रीकांत शिंदे यांचं मोठं विधान) मंत्री बच्चू कडू यांनी ईडीच्या मुद्द्यावरून भाजपवर केलेल्या टीकेला भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. "मंत्री बच्चू कडू हे आधी काय बोलत होते आणि आता काय बोलत आहेत हे सर्वांना दिसत आहे. आता त्यांना खुर्ची मिळाली त्यामुळे त्यांचा बोलण्याचा रोख बदलला आहे", असा आरोपही गिरीश महाजन यांनी केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेतला आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत ते सर्व काळं धन बाहेर आणतील", असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. ईडीच्या कारवाया फक्त विरोधकांवर होत नाही तर बड्या उद्योगपतींवरही होत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून होणारी टीका चुकीची असल्याचे ते म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या