मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'फडणवीसांसोबत एका रात्रीत उपमुख्यमंत्री झालात, अन् आता...', महाजनांचं अजितदादांना प्रत्युत्तर

'फडणवीसांसोबत एका रात्रीत उपमुख्यमंत्री झालात, अन् आता...', महाजनांचं अजितदादांना प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीसांना 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला, यावर आता गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Shreyas

जळगाव, 26 सप्टेंबर : राज्य सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. फडणवीसांना 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला. 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मी पुण्याचा पालकमंत्री होतो तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही, पण शुभेच्छा आहे, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता किती आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. गेल्या काळात आपण काय काय पराक्रम केलेत हे पण महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही फडणवीसांच्या कार्यक्षमतेची चिंता करू नका,' असा सल्ला महाजन यांनी अजितदादांना दिला आहे.

'देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना तुम्ही विचार केला पाहिजे, त्यांच्याबरोबर तुम्ही एका रात्रीत उपमुख्यमंत्री व्हायला तयार होता, आता त्यांच्यात तुम्हाला काय वावगं वाटत आहे,' असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.

फडणवीसांचं प्रत्युत्तर

दरम्यान अजित पवारांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही काल प्रतिक्रिया दिली. 'येत्या काळात त्यांचं राज्य आलं आणि त्यांनाही 2-4 जिल्हे ठेवायचे असले तर ते कसे मॅनेज करायचे, याचा गुरूमंत्र मी त्यांनाही देईन. माझ्याकडे हे जिल्हे नियोजन मंत्री म्हणून हे जिल्हे माझ्याकडे आले आहेत. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे, त्यामुळे 6 जिल्ह्यांचं काय घेऊन बसला आहात?', असं फडणवीस म्हणाले.

First published:

Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis