अहमदनगर, 4 फेब्रुवारी : 'अण्णांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मांडत असलेल्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे अण्णा हजारे उद्या दुपारपर्यंत उपोषण मागे घेतील,' असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
लोकपालाची नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अण्णांचं वय 82 वर्षांचं असून गेल्या पाच दिवसांमध्ये त्यांचं 4 किलो वजन कमी झालं आहे. अण्णांच्या मागण्यांच्या समर्थनासाठी राळेगणचे ग्रामस्थही आता रस्त्यावर उतरले आहेत.
'मंत्र्यांवर विश्वास नाही'
मंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही, किती खोटं बोलावं याला देखील सीमा असते', अशा शब्दांत गेल्या 6 दिवसांपासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सरकारवर तोफ डागली. 'ज्या लोकापाल विधेयकाच्या चर्चेवरून ही लोकं सत्तेत आली आता त्यांना अॅलर्जी झाली आहे', अशी टीकाही त्यांनी केली.
अण्णांनी मंत्र्यांना भेटण्यासही नकार दिल्यानं सरकारसमोर नवा पेच निर्माण होऊ शकतो. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णा हजारेंशी चर्चा करण्यासाठी पोहोचले होते.
राज ठाकरेंकडून भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवारी) ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी मनसेकडून अण्णांचा आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
काय म्हणाले राज?
- मोदीसाठी जीव धोक्यात घालू नका
- अण्णांमुळे मोदी आज सत्तेत
- आज अरविंद केजरीवाल येथे यायला हवे होते
- कोण ओळखत होते केजरीवाल
- मोदींनी एकेकाळी अण्णांना पाठिंबा दिला होता
- गेल्या चार वर्षात काही केले नाही
- लोकपालासाठी काँग्रेसला शिव्या घालणारे भाजपवाले आज गप्प
VIDEO : गडावरचा गडकरी महत्त्वाचा असतो -राज ठाकरे