19 मार्च : 23 मार्चला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णयाय घेतलाय. यावर केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. केंद्र सरकारचे 3 पानी पत्र घेऊन राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी आज अण्णांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धीत दाखल झाले. तसंच अण्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फोनवरूनही चर्चा केली आहे.
लोकपाल, कृषी मूल्य आयोग आणि शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अण्णांनी केंद्र सरकारला 43 पत्र लिहिले होते. तसंच 23 मार्चपासून दिल्ली उपोषणाला बसणार अशी घोषणा केली होती.
अण्णांनी वारंवार पत्रव्यवहार करून कोणतेही उत्तर मिळत नसल्यामुळे अण्णांना केंद्र सरकारला तीन पानी पत्र पाठवले. त्यानंतर आज राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी आज अण्णांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धीत दाखल झाले. तसंच अण्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फोनवरूनही चर्चा केली आहे.
अण्णांच्या मागण्यांवर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन गंभीर असून मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहेत. अण्णा हजारेंनी केंद्र सरकारला 43 पानी पत्र लिहिलंय. आता अण्णांची मनधरणी करण्यासाठी गिरीष महाजन राळेगणसिद्धीमध्ये तळ ठोकून आहेत.