मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जळगावात गिरीश महाजनांचा शिवसेनेला जबरदस्त धक्का, भाजपच्या बंडखोर नगरसेवकांची घरवापसी

जळगावात गिरीश महाजनांचा शिवसेनेला जबरदस्त धक्का, भाजपच्या बंडखोर नगरसेवकांची घरवापसी

भाजपच्या 30 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता.

भाजपच्या 30 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता.

भाजपच्या 30 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता.

जळगाव, 10 ऑक्टोबर: राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना (Shivsena) आणि विरोधी पक्ष भाजप (BJP) यांच्यात संघर्ष सुरुच आहे. त्यातच जळगाव (Jalgaon) मध्येही दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वावरुन जोरदार चढाओड सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी जळगावमध्ये शिवसेनेनं भाजपला धक्का देत महापालिकेच्या सत्तेतून बाहेर केलं. त्यावेळी भाजपच्या 30 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. या 30 नगरसेवकांनी (corporators) बंडखोरी केली होती. मात्र आता काही महिने उलटल्यावर भाजपनंही शिवसेनेवर पलटवार केला आहे. या 30 बंडखोर नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे.

आज भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. सुरेश सोनावणे, शोभा बारी आणि हसिना बी. शेख या नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी केली.

हेही वाचा- विवाहित महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्याला चोप, मनसे कार्यकर्त्यांनी बेदम हाणलं

काही दिवसांमध्ये जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक ही होणार आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेत गेलेल्या भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातोय.

भाजपनं जळगाव महानगरपालिका निवडणुकीत 57 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. मात्र याचवर्षी मार्च महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीवेळी भाजपमध्ये फूट पडली होती. भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेत प्रवेश केला होता.

हेही वाचा- संजय राऊतांकडून प्रियंका गांधींचं कौतुक, सांगितली राहुल गांधींच्या मनातली  खंत 

यावेळी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार प्रतिभा कापसे पराभूत तर शिवसेनेच्या जयश्री महाजन विजयी झाल्या होत्या. दुसरीकडे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवारी कुलभूष पाटील विजयी ठरले होते.

First published:

Tags: BJP, Girish mahajan, Jalgaon, Shivsena