VIDEO : अपघातात रक्तबंबाळ झाला होता तरूण, महाजनांनी स्वत:च्या इनोव्हात नेलं हाॅस्पिटलला!

VIDEO : अपघातात रक्तबंबाळ झाला होता तरूण, महाजनांनी स्वत:च्या इनोव्हात नेलं हाॅस्पिटलला!

अपघातात दुचाकीस्वार रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडून होता

  • Share this:

अहमदनगर, 25 जानेवारी : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एका अपघातग्रस्त तरुणाला मदत केली. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीला जात असतांना रस्त्यावर अपघातात जखमी असलेल्या तरुणाला त्यांनी स्वतःच्या गाडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

औरगाबादहून अहमदनगर येथे अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी गिरीष महाजन हे जात होते. त्यावेळी नगरजवळ रस्त्यावर एक दुचाकी ट्रकवर धडकली होती. या अपघातात दुचाकीस्वार रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडून होता.

उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी 108 रुग्णवाहिकेला संपर्क केला होता. मात्र, बराच वेळ होऊन ही रुग्णवाहिका आली नाही. नेमकं त्याच वेळी तिथून जात असलेले गिरीश महाजन घटनास्थळी थांबले. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता त्यांनी तात्काळ तरुणाला स्वतः वाहनात टाकलं. तरुणाला नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

=======================

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading