पुणे शहरात यंदा पाणीकपात नाही -गिरीश बापट

पुणे शहरात यंदा पाणीकपात नाही -गिरीश बापट

आज कालवासमितीची बैठक झाली त्यात पुणे जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन 16 जुलैपर्यंतच नियोजन करण्यात आलंय

  • Share this:

हलिमा कुरेशी, पुणे

10 एप्रिल : पुणे शहरात सध्या तरी पाणीकपात करणार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. दोन वेळा होणार पाणीपुरवठा कायम राहणार असून पुणेकरांनी काटकसरीने  पाणी वापरावं असं आवाहन त्यांनी केलं.

आज कालवासमितीची बैठक झाली त्यात पुणे जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन 16 जुलैपर्यंतच नियोजन करण्यात आलंय.  दौंड इंदापुरला खड्कवासल्यातून पाणी सोडले तरी 60 टक्के पाण्याची गळती होत असल्याचं  मुख्य अभियंते कपोले यांनी सांगितलं.

लवकरच भामा आसखेडमधून पुणे शहराला पाणी पुरवठा संबंधी असलेल्या अडचणी फर करू असे आश्वासनही त्यांनी दिलं. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत  10.26 टीएमसी पाणीसाठा आहे. पुणे शहराला दररोज 1350 एमएलडी पाण्याची गरज असते. मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा चांगला असल्याने यावर्षी पाणीकपात करणार नसल्याचं सांगितलं. दौंड इंदापुरसाठी उन्हाळी आवर्तन 45 दिवस सोडलं जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 09:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading