मुंबई,25 जानेवारी: घाटकोपर पश्चिमेला असलेला रेड लाईट एरिया बंद करण्याची मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली. बाजूला कॉलेज आणि मंदिर असल्याने सामान्य लोक आणि विद्यार्थ्याची गैरसोय होत असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे. देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांना रोजगार आणि पुनर्वसन करण्याची मागणीही राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आता विरोधी पक्षाच्या बाकावर बसू पण, 2022 ला महापौर भाजपचाचमहापालिकेत आता भाजपा विरोधी बाकांवर बसणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी दिली आहे. पण, 2022 ला मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर असेल, असा विश्वासही कदम त्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीमुळे मुंबई महापालिकेत असलेली शिवसेना आणि भाजपाची युती संपुष्टात आली आहे. मुंबई महापालिकेत भाजपचे 83 नगरसेवक आहे. तर अपक्षांसह शिवसेनेकडे 94, काँग्रेसचे 29 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 9 नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला मुंबई महापालिकेत जमेत धरला तर महाविकास आघाडीकडे 132 नगरसेवकांचं बळ असेल. सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपा भूमिका निभावणार आहे, असे राम कदम यांनी जाहीर केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.