• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • धनगर समाजाचा आरक्षणासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा

धनगर समाजाचा आरक्षणासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं, यासाठी आज धनगर समाजाने थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. धनगर समाजाचे आमदारही या मोर्चात सहभागी झाले होते.

  • Share this:
मुंबई, 1 ऑगस्ट : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं, यासाठी आज धनगर समाजाने थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. यशवंत सेनेनं आयोजित केलेल्या या मोर्च्याला पोलिसांनी भायखळ्यातील जिजामाता उद्यानापासून हा मोर्चा काढण्यात आला होता. पण पोलिसांनी मोर्चाला मध्येच अडवून आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. धनगर समाजाचे आमदारही या मोर्चात सहभागी झाले होते. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचं आश्वासन देऊनच हे सरकार सत्तेवर आलंय पण धनगर आरक्षणाला अद्यापही केंद्राकडून हिरवा कंदिल मिळालेला नाही. सरकारच्या याच नाकर्तेपणाविरोधात धनगर समाजाने हा धडक मोर्चा काढला होता. यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी यांनी हा सरकारविरोधी मोर्चा काढण्यात पुढाकार घेतला होता.
First published: