Home /News /maharashtra /

विनाकारण घराबाहेर निघाल तर गाढवावरून धिंड! सरपंचांनी लढवली अजब शक्कल

विनाकारण घराबाहेर निघाल तर गाढवावरून धिंड! सरपंचांनी लढवली अजब शक्कल

कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. मात्र या दरम्यान काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत.

बीड, 31 मार्च: कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. मात्र या दरम्यान काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरस आणखी पसरण्याची शक्यता आहे. याला आळा घालण्यासाठी गावात बीड जिल्ह्यातील टाकळी येथील गावकऱ्यांनी एक अजब निर्णय घेतला आहे. घराबाहेर विनाकरण फिरणाऱ्यांची गाढवावरुन धिंड काढण्यात येईल, असा निर्णय टाकळीच्या गावकऱ्यांनी घेतला आहे. हेही वाचा...धक्कादायक! भाजप नेत्याकडून लॉकडाऊनचं उल्लंघन, घरात सुरू होतं चित्रपटाचं शूटिंग एक वेळ विनाकारण बाहेर आढळून आल्यास पाचशे रुपये दंड, तीन वेळा आढळून आला तर थेट गाढवावरुन धिंड असा निर्णय टाकळी गावच्या गावकऱ्यांनी एकमुखाने घेतला आहे. आता या गावची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. थेट गावात दवंडी देऊन या निर्णयाची माहिती सगळ्यांना देण्यात आली. खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गावात स्वच्छता मोहिमही राबवण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणार नाही, असा विश्वासही गावच्या सरपंचांनी व्यक्त केला. हेही वाचा...कल्याणमध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेलाच झाली कोरोनाची लागण लॉकडाऊनमध्ये लोकांनी बाहेर निघू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती करत आहेत. मात्र, काही रिकामटेकडे फेरफटका मारून येऊ म्हणून गावात विनाकारण फिरत आहेत. यावरती प्रतिबंध म्हणून बीड जिल्ह्यातील टाकळी गावातील सरपंचांनी आगळीवेगळी शक्कल लढवली आहे. हेही वाचा...बारामतीत कोरोनाबाधित रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांबद्दल दिलासादायक बातमी! गावातील प्रमुख बैठकीच्या ठिकाणी ऑईल आणि डांबर टाकून ही ठिकाणे काळी केली आहेत. एवढेच नाही तर कोरोनापासून खबरदारी म्हणून गावातील कोणीही विनाकारण फिरताना दिसून आल्यास पाचशे रुपयांचा दंड केला जाणार आहे, वारंवार सांगूनही तोच व्यक्ती तीन वेळ आढळून आला तर त्याची गाढवावरून धिंड काढण्यात येणार असल्याची दवंडी देखील सरपंचांनी दिली आहे. त्यामुळे कोरोना आणि गाढवावरून धिंड टाळायचे असेल तर कुणीही विनाकारण बाहेर फिरू नये, असा सल्लाही गावच्या सरपंचांनी दिला आहे तर या निर्णयाचे सर्व गावकऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Beed, Coronavirus

पुढील बातम्या