मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : सत्यनारायण पूजेला गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणं आयोजकास भोवलं

Video : सत्यनारायण पूजेला गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणं आयोजकास भोवलं

गौतमी पाटील

गौतमी पाटील

नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सत्यनारायणाच्या पूजेला ठेवणं आयोजकाच्या अंगलट आलं आहे. त्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Vasai-Virar City, India

ठाणे, 26 मे : राज्यात सध्या नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलंच गाजत आहे. यात्रा असो किंवा पुढाऱ्यांचा वाढदिवस गौतमी पाटीलचा कार्यक्रम आवर्जून आयोजित केला जात आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत गौतमीच्या कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती पाहायला मिळते. नुकतेच गौतमी पाटीलला चक्क सत्यनारायणाच्या पूजेच्या कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं. मात्र, यावरुन आता आयोजकावर गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी सोलापुरातील बार्शीमध्येही आयोजकावर गुन्हा दाखल झालेला आहे.

काय आहे प्रकरण?

वसई येथील खार्डी याठिकाणी होणाऱ्या सत्यनारायण पूजेनिमित्त एका कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलावण्यात आलं होतं. 25 मे ला हा कार्यक्रम पार पडला. या गावात पहिल्यांदाच गौतमीचा कार्यक्रम होणार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे मांडवी पोलीस कर्मचाऱ्यांना याठिकाणी बंदोबस्त करावा लागला होता. दरम्यान या कार्यक्रमात परवानगीच्या अटी शर्थीचा भंग केल्याप्रकरणी भादवी कलम 188 नुसार आयोजक प्रभाकर पाटील यांच्यावर विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाची परवानगी 10 वाजेपर्यंत असताना रात्री 11 च्या नंतर सुद्धा कार्यक्रम सुरूच ठेवल्याने मांडवी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

वाचा - 'द केरला स्टोरी' चित्रपटानंतर पुण्यात लव जिल्हादची केस समोर? चार वर्षानंतर मुलगी वाईट..

बार्शीत आयोजका विरोधात तक्रार

12 मे रोजी बार्शी येथे राजेंद्र गायकवाड यांनी गौतम पाटील हिचा लावणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, गौतम पाटील हिचा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. पोलिसांनी रात्री दहा वाजता वेळेची मर्यादा ओलांडल्यामुळे गौतम पाटीलचा कार्यक्रम पोलिसांनी बंद पडला. मात्र, आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी कोणतीही शासकीय कार्यालयाची परवानगी घेतली नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच लेखी कळवूनही गौतमी पाटील हिचा सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आयोजकाची गौतमीविरोधात तक्रार

तर आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी नृत्यांगणा गौतमी पाटील विरोधात फसवणुकीची बार्शीत पोलिसात तक्रारी अर्ज दाखल केली. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल केला आहे. फसवणूक करून मला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गायकवाड यांनी तक्रार दिली. गौतमी पाटील 7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्याने कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Gautami Patil, Thane