शिवसंपर्क यात्रेची माहितीच नव्हती, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा खळबळजनक खुलासा

शिवसंपर्क यात्रेची माहितीच नव्हती, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा खळबळजनक खुलासा

बुद्धजयंतीच्या कार्यक्रमासाठी हिमाचलमध्ये असल्याचा चाबुकस्वार यांनी दावा केलाय.

  • Share this:

14 मे : शिवसेनेच्या शिवसंपर्क यात्रेचे तीनतेरा वाजलेत.  आपल्याला शिवसंपर्क यात्रेची माहितीच नव्हती शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा खळबळजनक खुलासा आयबीएन लोकमतकडे केलाय.गौतम चाबुकस्वार यांच्या जागी यशोधर फणसे यांची चाबूकस्वार म्हणून ओळख करून दिल्यानं गदारोळ झाला होता.तर बुद्धजयंतीच्या कार्यक्रमासाठी हिमाचलमध्ये असल्याचा चाबुकस्वार यांनी दावा केलाय.

IBNलोकमतशी बोलताना चाबुकस्वार म्हणाले की, ' मला या शिवसंपर्क यात्रेबद्दल काहीही माहीत नव्हतं. हिमाचलमध्ये बौद्धजयंतीचा कार्यक्रम आधीच ठरला होता.  तिथे मी गेलो होतो. '

आपल्या जागी दुसरीच व्यक्ती चाबूकस्वार म्हणून गेली, याबद्दल काही माहीत नसल्याचं ते म्हणाले. ते पुढे असंही म्हणाले,' साहेबांचा आदेश मी नेहमीत पाळतो. याआधी लातूर,धुळे इथल्या कार्यक्रमाला हजर होतो. पण या शिवसंपर्क यात्रेबद्दल काही माहीत नसल्यानं मी हिमाचलमध्ये होतो. '

तर अनेक आमदारांचे कार्यक्रम हे पूर्वनियोजित असल्यामुळे ते या शिवसंपर्क अभियानात सहभागी होऊ शकलेले नाहीत आणि ते जाणिवपूर्वक गैरहजर राहिले असं म्हणणं अयोग्य असल्याचं शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना म्हटलं आहे.

First published: May 14, 2017, 2:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading