मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: सांगली मार्केट यार्डात गवा शिरला; परिसरात कलम 144 लागू, नागरिकांमध्ये दहशत

VIDEO: सांगली मार्केट यार्डात गवा शिरला; परिसरात कलम 144 लागू, नागरिकांमध्ये दहशत

Sangli News: गेल्या तीन दिवसापासून सांगलीवाडी परिसरात एक महाकाय गवा धुमाकूळ घालत होता. आज पहाटे हा महाकाय गवा आयर्विन पूल परिसरातून सांगली शहराच्या दिशेने आला आहे.

सांगली, 28 डिसेंबर: गेल्या तीन दिवसापासून सांगलीवाडी परिसरात एक महाकाय गवा धुमाकूळ घालत आहे. सांगली शहराच्या सीमेवर धुमाकूळ घातल्यानंतर हा महाकाय गवा आज पहाटे आयर्विन पूल परिसरातून शहराच्या दिशेने आला आहे. आयर्विन पूल, गणपती पेठ, वखारभाग, एस एफ सी मॉल, सावली बेघर निवारा केंद्र या मार्गाने मार्गक्रमण करत हा गवा शेवटी सांगलीतील मार्केट यार्ड परिसरात घुसला (Gaur enters in market yard) आहे. मार्केट यार्ड परिसरात घुसल्यानंतर गव्याने विध्वंस करायला सुरुवात केली आहे. मार्केट यार्ड परिसरातील वेअर हाऊस परिसरात पहाटे पाच वाजता हा गवा स्थानिक नागरिकांना दिसला. या प्रकारानंतर याठिकाणी तात्काळ नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणि वनविभागाला देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक निरीक्षक अमित कुमार पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील यांच्यासह प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, कौस्तुभ पोळ, तबरेज खान आणि निखिल शिंदे आदी घटनास्थळी उपस्थित झाले आहे. हेही वाचा- 2 लोखंडी गेट तोडून आला पुण्यात रानगवा, रेस्क्यू थराराचा पहिला VIDEO मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या नागरिकांवर गवा हल्ला करू शकतो. त्यामुळे मार्केट यार्ड आज बंद ठेवण्यात आलं असून परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं (Curfew imposed in market yard area) आहे. आज सकाळपासूनच मार्केट यार्ड परिसरातील दोन्ही मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. तसेच सर्व वाहतुकही बंद करण्यात आली आहे. सकाळी आठच्या सुमारास संपूर्ण मार्केट यार्ड परिसर शांत होतं. बाजार समितीच्या अधिकारी संचालकांनी घटनास्थळी धाव घेत बंदचं आवाहन केलं आहे. खरंतर, सांगलीची मार्केट कमिटी बंद ठेवल्यानं एका दिवसात तब्बल 10 कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे. याचा फटका व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना देखील बसणार आहे. अद्याप या मोकाट गव्याला पकडण्यात आलं नसून प्राणी मित्र आणि वनविभागाचे कर्मचारी गव्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Sangli

पुढील बातम्या