FREE KASHMIR म्हणजे काय? फलक धरलेल्या मुलीनेच केला खुलासा

FREE KASHMIR म्हणजे काय? फलक धरलेल्या मुलीनेच केला खुलासा

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल करताना म्हटलं की, मुख्यमंत्री कार्यालयापासून केवळ 2 किमी अंतरावर असे प्रकार कसे खपवून घेतले जात आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी : जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर देशभरात त्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. जेएनयुनंतर जाधवपूर विद्यापीठातही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, मुंबईत गेटवे ऑफ इंडियासमोर आंदोलन करणाऱ्यांना तिथून हटवलं असून पोलिसांनीच त्यांना आझाद मैदानात सोडलं आहे. गेटवे ऑफ इंडियासमोर झालेल्या आंदोलनातील फ्री काश्मीर पोस्टरमुळे वाद निर्माण झाला आहे. या फलकावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

गेटवे ऑफ इंडियासमोर फ्री काश्मीरचा फलक घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या मुलीनेच आता त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महेकने म्हटलं की, भारतापासून काश्मीर स्वतंत्र कऱण्यासाठी नाही तर तिथल्या लोकांनाही इतर भारतीय नागरिकांप्रमाणे स्वातंत्र्य मिळावं म्हणून हा फलक झळकावला.

महेक म्हणाली की, काश्मीरमधून मानवता हरवली आहे. आपण इथं राहून तिथल्या अडचणी, समस्या समजून घेऊ शकत नाही. आपण जसे स्वतंत्र आहोत तसंच स्वातंत्र्य काश्मीरमधील लोकांनाही मिळायला पाहिजे. मी मुंबईची आहे तरीही हे बोलत आहे. काश्मीरी लोकांच्या पाठिमागे आपण उभा राहिलं पाहिजे. गेल्या 150 दिवसांपासून तिथले सर्व व्यवहार ठप्प आहेत. आपण असे दिवस काढू शकणार नाही. आपल्या या लढ्यात काश्मिरी नागरिकांना सोबत ठेवून त्यांनाही स्वातंत्र्य मिळावं एवढीच माझी मागणी आहे.

विद्यार्थ्यांनी या विरोध प्रदर्शनांमध्ये FREE KASHMIRचे पोस्टरचे पोस्टर्स झळकविल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावरून उद्धव ठाकरे यांना सवाल केलाय. मुख्यमंत्री कार्यालयापासून केवळ 2 किमी अंतरावर ही प्रदर्शने होत आहेत. हे कसं खपवून घेतलं जातंय असाल सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय.

फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. आझादी गँगकडून ज्या प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत त्या आक्षेपार्ह असून मुंबईत हे कसं सहन केलं जातंय असा सवाल त्यांनी केलाय. तुमच्या नाकाखाली असे पोष्टर्स लागतातच कसे असा सवालही फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केलाय.

JNU हल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्यांना गेटवे ऑफ इंडियासमोरून हटवलं

First published: January 7, 2020, 11:01 AM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading