मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रायगडमधील MIDCमध्ये वायू गळती; 7 जण बाधित, रुग्णालयात केलं दाखल

रायगडमधील MIDCमध्ये वायू गळती; 7 जण बाधित, रुग्णालयात केलं दाखल

कंपनीतील प्रोडक्शन विभागात ही वायू गळती झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कंपनीतील प्रोडक्शन विभागात ही वायू गळती झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कंपनीतील प्रोडक्शन विभागात ही वायू गळती झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

रायगड, 21 जानेवारी : रायगड जिल्ह्यातील महाड MIDC येथील कंपनीत वायू गळती झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 7 कर्मचारी बाधित झाले असून या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी महाडमधील देशमुख रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महाड एमआयडीसीमधील इन्डो अमाईन्स कंपनीतून संध्याकाळ 6 च्या सुमारास वायू गळती सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीतील प्रोडक्शन विभागात ही वायू गळती झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अचानक त्रास होऊ लागला. या दुर्घटनेत सात जण बाधित झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. तसंच कंपनीच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. बाधित कर्मचाऱ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते.

हेही वाचा - Serum मधला धोका अजून टळला नाही? काही तासांनी पुन्हा भडकली आग

परिस्थिती सध्या नियंत्रणात असून दुय्यम अधिकारी व पोलीस हे स्टाफ कंपनीत हजर आहेत.

बाधा झालेल्या लोकांची नावे :

1. उत्तम किसन पवार वय 49, राहणार नागलवाडी

2. तेजस विजय चाळके वय 25, राहणार नाते

3. जयराम चंद्रकांत चौधरी वय 25, राहणार वडघर

4. पंकज कुमार सोहम महतो वय 20, राहणार छपरा बिहार

5. रजनीकांत नायर वय 34, राहणार कवेअली

6. दत्तात्रय साहेबराव कोल्हे वय 39, राहणार इंडो अमाईन्स कॉलनी महाड

7. पप्पू कमल महातो वय 30, राहणार बिहार छपरा

दरम्यान, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील विविध एमआयडीसीतील कंपन्यांमधील दुर्घटनांचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक ठिकाणी आगीच्या घटना समोर येत असतात. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Raigad, Raigad news